नवी दिल्ली: मध्यप्रदेशमधील भोपाळ सेंट्रल जेलमधून पळालेल्या ‘सिमी’च्या आठही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. जेलमधून फरार झाल्यानंतर अवघ्या काही तासात पोलिसांनी दहशतवाद्यांना शोध घेतला.


अचारपुरा गावात पोलिसांनी जेलमधून पळालेल्या सिमीच्या आठही दहशतवाद्यांना घेरलं. त्यानंतर दहशतवाद्यांना शरण येण्यास सांगितले. मात्र, शरण येण्यास नकार दिल्याने पोलिसांनी दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. पण आता या चकमकीबाबत प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी या घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

या चकमकीबाबत बोलताना ओवेसीं म्हणाले की, 'ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या हातात घड्याळ कुठून आलं?, त्यांनी पायात चांगले बूट आणि चांगले कपडे घातले. जेलमधून फरार झालेले कैदी एवढे चांगले कपडे कसे काय घालू शकतात?'

'मध्यप्रदेश सरकार आणि पोलिसांच्या वक्तव्यामध्ये देखील बराच फरक आहे. त्यामुळे या चकमकीची चौकशी व्हायला हवी. त्यांच्याजवळ कोणतंही हत्यार नव्हतं. त्यांच्याजवळ धातूची एक वस्तू दिसून येते आहे. पण ते एखादं हत्यार वाटत नाही.' असंही ओवेसी म्हणाले.

दरम्यान, प्रत्यक्षदर्शींना दिलेल्या माहितीनुसार, दशहतवाद्यांनी गावकऱ्यांना चाकू दाखवून धमकावलं होतं. तसंच दहशवाद्यांकडून गावकऱ्यांवर विटाही फेकण्यात आल्या होत्या. अशी माहिती समजते आहे.

संबंधित बातम्या:

भोपाळ सेंट्रल जेलमधून पळालेल्या सिमीच्या आठही दहशतवाद्यांचा खात्मा