VIDEO : मिरवणुकीत उपसभापती हत्तीवरुन पडले, दुखापत नाही
एबीपी माझा वेब टीम | 08 Oct 2018 01:24 PM (IST)
उपसभापतीपदी नियुक्ती झाल्यानंतर समर्थकांनी भाजप आमदार कृपानाथ मल्लाह यांची मतदारसंघात हत्तीवरुन मिरवणूक काढली.
गुवाहाटी : भाजप आमदार आणि आसाम विधानसभेचे नवनिर्वाचित उपसभापती अपघातातून सुखरुप बचावले. मिरवणुकीत हत्तीवरुन कृपानाथ मल्ला पडले, मात्र त्यांना सुदैवाने गंभीर दुखापत झालेली नाही. कृपानाथ मल्ला हे आसाममधील करीमगंज जिल्ह्यातील राताबरीमधून भाजपतर्फे आमदार आहेत. उपसभापतीपदी नियुक्ती झाल्यानंतर समर्थकांनी त्यांची मतदारसंघात हत्तीवरुन मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक सुरु असताना अचानक हत्ती सैरावैरा पळत सुटला. त्यामुळे माहूत आणि कृपानाथ मल्ला यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. समर्थकांनी लागलीच त्यांच्या दिशेने धाव घेत त्यांना उचललं. सुदैवाने त्यांना दुखापत झालेली नाही. ही घटना कॅमेरात कैद झाली आहे.