Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत राम मंदिरात (Ram Mandir) रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. सोमवारी 22 जानेवारी रोजी  प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे  उद्घाटन होणार आहे. त्यासाठी अवघे काही मिनिटं शिल्लक आहेत. भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्राणप्रतिष्ठे निमित्ताने देशवासियांना खास संदेश दिला. आपल्या सभ्यतेच्या प्रवासाच्या इतिहासात 22 जानेवारी हा दिवस 'देवत्वाचा प्रयत्न' या अर्थाने परिभाषित क्षण म्हणून कोरला जाईल, असे धनखड यांनी आपल्या मेसेजमध्ये म्हटले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी ट्वीट करत प्राणप्रतिष्ठापनाबाबत सर्वांचे अभिनंदन केले आहे. 


रामजन्मभूमी असलेल्या या ऐतिहासिक नगरी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या या युगप्रवर्तक दिनी आपल्या सर्वांचे अभिनंदन, असे धनखड यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेय की,  सर्वत्र राष्ट्रीय अभिमान जागृत करणाऱ्या या उत्सवाच्या क्षणाचे साक्षीदार झाल्याबद्दल अतिशय आनंद होत आहे. आपल्या 11 दिवसांच्या कठोर ‘अनुष्ठान’नंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्याला मार्गदर्शन करणार्‍या इतर यजमान, संत आणि संतांच्या उपस्थित होणाऱ्या या सोहळ्याचे नेतृत्व करत आहेत त्याबद्दल त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.


 22 जानेवारीची इतिहासात नोंद होईल -


आपल्या सभ्यतेच्या प्रवासाच्या इतिहासात 22 जानेवारी हा दिवस 'देवत्वाचा प्रयत्न' या अर्थाने परिभाषित क्षण म्हणून कोरला जाईल. आजच्या दिवशी आपण प्रभू श्री राम यांची सचोटी, क्षमा, शौर्य, प्रामाणिकपणा, विनम्रता, काळजी आणि करुणा ही जीवनपद्धती आत्मसात करून सर्वत्र आत्मज्ञान, शांती, सौहार्द आणि धार्मिकता आणण्याचा संकल्प करूया. अयोध्या या ऐतिहासिक नगरी, रामजन्मभूमी येथील राममंदिर प्राणप्रतिष्ठेच्या या युगप्रवर्तक दिनानिमित्त अभिनंदन, असे धनखड यांनी ट्वीट केले आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा!


सर्वत्र राष्ट्रीय अभिमान जागृत करणाऱ्या उत्सवाच्या क्षणाचे साक्षीदार झाल्याबद्दल खूप आनंद होत आहे. या सोहळ्याचे नेतृत्व केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनःपूर्वक शुभेच्छा, असे धनखड म्हणाले.  






आणखी वाचा -


आधी छत्रपती शिवरायांचा राज्यभिषेक, आता प्रभू श्री रामाची प्राणप्रतिष्ठा, मुख्य पुजारी दीक्षित कुटुंबाचं सोलापूर कनेक्शन!