Continues below advertisement


नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती निवडण्यासाठी उद्या मतदान होणार आहे. संसदेत सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खासदार मतदान करतील. यानंतर रात्री मतमोजणी पार पडेल आणि निकाल जाहीर केला जाईल. सर्व खासदारांना मतदानासंदर्भात एक चिठ्ठी पाठवण्यात आली आहे. त्यात त्यांचं नाव आणि क्रमांक असेल. या आधारावर खासदारांना त्याचं नाव कुठं आहे आणि मतदानासाठी कोणत्या क्रमानं जायचं आहे हे समजेल.


खासदारांना पसंतीक्रम लिहावा लागणार


मतदानावेळी खासदारांना एक बॅलेट पेपर दिला जाईल. त्या मतपत्रिकेवर दोन्ही उमेदवारांचं म्हणजेच सीपी राधाकृष्णन आणि बी. सुदर्शन रेड्डी यांचं नाव असेल. खासदार त्यांच्या पसंतीक्रमानुसार 1 आणि 2 अंक लिहू शकतात. बहुतांश राजकीय पक्ष आणि आघाड्या केवळ 1 क्रमांक नोंदवून त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावापुढं लिहू शकतात. राज्यसभा सचिवालयाकडून खासदारांना पसंतीक्रम लिहिण्यासाठी दिलेल्या पेनचा वापर करावा लागेल.


उपराष्ट्रपती निवडणूक संख्याबळ?


उपराष्ट्रपती निवडणुकीत म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेत एकूण 782 खासदार आहेत. विजयासाठी उमेदवाराला 391 मतांची आवश्यकता आहे. सध्याच्या समीकरणानुसार एनडीएकडे 427 मतं आहेत. वायएसआर काँग्रेसनं एनडीएला पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे बिजू जनता दलाचे 7 खासदार आणि भारत राष्ट्र समितीचे 4 खासदार मतदानाच्या प्रक्रियेपासून दूर राहतील. विरोधी इंडिया आघाडीकडे 324 मतं आहेत.


एनडीएतील पक्षाचं बलाबल


भारतीय जनता पार्टी (भाजप):


लोकसभा: 240 खासदार


राज्यसभा: जवळपास 100 खासदार


 


तेलुगु दे पार्टी (टीडीपी):


लोकसभा: 16 खासदार


राज्यसभा: 2 खासदार


 


जनता दल (यूनाइटेड) - जदयू:


लोकसभा: 12 खासदार


राज्यसभा: 4 खासदार


 


लोक जनशक्ति पार्टी (रामविलास):


लोकसभा: 5 खासदार


 


शिवसेना (शिंदे):


लोकसभा: 7 खासदार


राज्यसभा: 1 खासदार


 


जन सेना पार्टी (JSP):


लोकसभा: 2 खासदार


 


जनता दल (सेक्युलर):


लोकसभा: 2 खासदार


राज्यसभा: 4 खासदार


 


राष्ट्रीय लोक दल (RLD):


लोकसभा: 2 खासदार


 


राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)


लोकसभा: 1 खासदार


राज्यसभा: 3 खासदार


एनडीएतील इतर राजकीय पक्ष (अपना दल, एजीपी, एजेएसयू, हम (सेक्युलर), SKM, UPP, अपक्ष)


 


इंडिया आघाडीतील राजकीय पक्ष आणि खासदार


 


कांग्रेस (INC):


लोकसभा- 99 खासदार


राज्यसभा 27 खासदार


 


 


समाजवादी पार्टी (SP):


लोकसभा - 37 खासदार


राज्यसभा - 4 खासदार


 


 


तृणमूल कांग्रेस (TMC / AITC):


लोकसभा- 29 खासदार


राज्यसभा 13 खासदार


 


द्रमुक (DMK):


लोकसभा- 22 खासदार


राज्यसभा 10 खासदार


 


शिवसेना (UBT):


लोकसभा - 9 खासदार


राज्यसभा - 2 खासदार


 


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार :


लोकसभा - 8 खासदार


राज्यसभा - 2 खासदार


 


आरजेडी (RJD):


लोकसभा - 4 खासदार


राज्यसभा - 5 खासदार


 


कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) [CPI(M)]:


लोकसभा - 4 खासदार


राज्यसभा - 4 खासदर


 


जम्मू काश्मीर शनल कॉन्फरन्स (JKNC):


लोकसभा - 2 खासदार


 


कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (CPI):


लोकसभा - 2 खासदार


राज्यसभा - 2 खासदार


 


VCK – 2


IUML– 3


RSP – 1, आणि इतर )


 


दरम्यान, विरोधी पक्षांकडून माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एनडीएचे काही खासदार क्रॉस वोटिंग करु शकतात, अशी अपेक्षा विरोधकांना आहे. विरोधी पक्षांचे खासदार क्रॉस व्होटिंग होऊ नये म्हणून केवळ 1 हा क्रमांक नोंदवतील. सध्याच्या आकडेवारीनुसार सीपी राधाकृष्णन भक्कम स्थितीत आहेत.