Varun Gandhi Assets: भाजप नेते वरुण गांधी हे पिलीभीतचे खासदार आहेत. वरुण गांधी यांची गणना करोडपती खासदारांमध्ये केली जाते. वरूण गांधी हे नेहमीच चर्चेत असतात. मात्र, आता त्यांच्याकडं असलेली संपत्तीमुळं ते चर्चेत आले आहेत. वरूण गांधी यांच्याकडं त्यांची आई मेनका गांधी यांच्यापेक्षा अधिक संपत्ती असल्याची माहिती समोर येत आहे. तर, वरूण गांधी यांच्याकडं किती प्रॉपर्टी, दागिने आणि पैसे आहेत? याबद्दल जाणून घेऊयात. 


उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरुण गांधी त्यांच्या पक्षाचा प्रचार करीत आहेत. अलिकडेच भाजपनं अनेक मुद्द्यावरून त्यांना घेरलं होतं. त्यानंतर भाजपनं त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीतून हकालपट्टी केली. 


वरुण गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे 60 कोटींहून अधिक संपत्ती असल्याचे सांगितलं होतं. वरुण गांधी आणि त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात 21 कोटी रुपये आहेत. त्यांच्याकडं एक कारही आहे. याशिवाय वरुण गांधी यांच्याकडे 98 लाख 57 हजारांचे दागिने आहेत. वरुण गांधी यांच्या नावावर 32 कोटी 55 लाखांची व्यावसायिक इमारत आहे. त्याचबरोबर त्यांच्या पत्नीच्या नावावर एक कोटींची निवासी इमारत आहे.


मनेका गांधी यांची मालमत्ता


वरुण गांधी यांच्या आई आणि सुलतानपूरच्या खासदार मनेका गांधी यांच्याकडे 2014 मध्ये 37 कोटी रुपयांची संपत्ती होती. यानंतर, 2019 मध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, मालमत्ता 54 कोटी 20 लाख रुपयांपर्यंत वाढली. मनेका गांधींच्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये 18 कोटी 37 लाख रुपये जमा आहेत. त्याचबरोबर त्याच्याकडे एक कोटींचे दागिने आहेत. मेनका गांधी यांच्या नावावर एकही वाहन नाही. त्यांच्या नावावर 9 कोटी 55 लाखांची व्यावसायिक इमारत आणि 20 कोटी रुपयांची निवासी इमारत आहे.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha