सूरत : महाराष्ट्र सिमेलगत असलेल्या गुजरातच्या डांग जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसला भीषण अपघात झाला आहे. डांग जिल्ह्यातील महल येथे 300 फूट दरीत बस कोसळून हा अपघात झाला. या अपघातात 10 विद्यार्थ्यांचा मृत्यू , तर 60 विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुरत जिल्ह्यातील अमरोली गावातील खासगी शिकवणी क्लासेसची ही बस होती. डांग जिल्ह्यातील महल येथे  क्लासची सहल येथे गेली होती. शनिवारी संध्याकाळी सहलीवरुन परत असताना महाल-बर्डीपाडा घाटात चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस दरीत कोसळून हा अपघात झाला. शबरीधाम, पंपा सरोवर आणि महाल कॅम्प पाहिल्यानंतर घरी परतत असताना हा अपघात झाला आहे. अपघात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.