नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने एक निमंत्रण पत्र जारी करुन उत्तर प्रदेश सरकारने 13 डिसेंबरला एका मोठ्या कार्यक्रमाची जंगी तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काशी विश्वनाथ धामच्या लोकार्पणाचा सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी देशभरातील 25 हजार साधूंना पत्र लिहिण्यात आलं असून त्यांच्या भक्तांनीही उपस्थिती लावावी असं आवाहन करण्यात आलं आहे.


वाराणासीमध्ये गेल्या काही वर्षामध्ये कशा प्रकारचे बदल करण्यात आले आहेत, काशी विश्वनाथाचे कशा प्रकारचे भव्य मंदिर बनवण्यात येणार आहे तसेच या दरम्यान काय आव्हानं आली, त्याचा सामना कशा प्रकारे केला गेला याची सविस्तर माहिती या सर्व साधूंना देण्यात येणार आहे. 


भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार
येत्या 13 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यासाठी देशातील सर्व भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण पाठवण्यात आलं आहे. तसेच देशातील 200 हून अधिक महापौर देखील या कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावणार आहेत. 


पुढच्या वर्षी सुरुवातीला उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काशी विश्वनाथ धामचा हा कार्यक्रम महत्वाचा असल्याचं सांगण्यात येत आहे. निवडणूक समोर ठेऊनच हा कार्यक्रम जंगी स्वरुपात साजरा करण्यात येणार आहे, तशी तयारी उत्तर प्रदेश सरकारने सुरु केली आहे. हा कार्यक्रम यशस्वी झाला तर योगी आदित्यनाथ सरकारला एक नवं बळ मिळणार असल्याचं सांगण्यात येतं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :