Uttarkashi Tunnel Rescue : उत्तराखंडमधील (Uttarakhand) उत्तरकाशी (Uttarkashi) इथं बोगद्यात अडकलेल्या मजुरांची अखेर सुटका करण्यात आली. या बोगद्यात 41 कामगार अडकले होते, त्यांची 17 दिवसांनी सुटका करण्यात आली. यशस्वी मोहिमेनंतर प्रशासन आणि मजुरांनाही सुटकेचा निश्वास सोडला. बोगद्यातून बाहेर आलेल्या 41 कामगारांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी आहे. उत्तरखंडचे मुख्यमंत्री धामी यांनी मजुरांसाठी मदतीची घोषणा केली आहे. प्रत्येक मजुराला एक एक लाख रुपयांची मदत मिळणार आहे. 


मुख्यमंत्री धामी म्हणाले की,  आजचा दिवस माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे. मजुरांच्या घरच्यांना जितका आनंद होतोय, तितकाच आनंद मलाही होत आहे. बचाव कार्यामध्ये जिवाचे रान करणाऱ्या प्रत्येक कर्मचारी, व्यक्तीचे मनापासून आभार व्यक्त करतो, त्या सर्वांनी देवदूत होऊन या अभियानाला यशस्वी केले. आम्हाला भगवान बौख नाग देवावर विश्वास होता. येथे त्यांचं मदिर तयार करु..






17 दिवसांनंतर सुटका 41 मजुरांची - 


12 नोव्हेंबरची पहाट... सूर्याचं डोकं नुकतंच वर येत होतं... हाडं गोठवणाऱ्या थंडीत कामगार बोगदा खणण्याचं काम करत होते... रोजच्या प्रमाणे त्यांनी काम सुरू केलं... तेव्हा त्यांच्या मनातही नव्हतं की, पुढचे काही दिवस आपल्याला अंधारात बसावं लागेल... चारी बाजूंनी फक्त भलेमोठे दगड आणि अवाढव्य ढिगारा असेल... पुढचे काही दिवस आपल्या नातलगांना भेटता येणार नाही हे त्यांच्या स्वप्नातही नव्हतं... इतकंच काय तर, आपण जगू की मरू याचीही शाश्वती नसण्याची परिस्थिती निर्माण होईल... तब्बल 41 वीर जीवघेण्या कोंडवाड्यात अडकले होते... त्यांना अन्न-पाणी आणि इतर वस्तू पोहोचवण्याची व्यवस्था तर झाली. पण, इकडे अखंड भारत त्यांच्या सुटकेसाठी आतूर झाला होता... शासन, प्रशासन, इंजिनीअर आणि परदेशी यंत्रणांच्या मदतीने बचावकार्य सुरू झालं... त्यात अमेक अडथळे आले... कधी खोदकाम करताना मजुरांच्या अंगावर दगड कोसळण्याची भीती तर कधी ड्रिल करण्यासाठी आलेल्या मशिनमध्ये बिघाड... असे सगळे अडथळे पार करून अखेरीस 41 मजुरांची 17 दिवसांनंतर सुटका झाली... आणि त्यांनी जग पाहिलं... मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचलेल्या या वीरांनी जिद्द, चिकाटी आणि धैर्याच्या जोरावर पुन्हा जग पाहिलं... माणसं पाहिली आणि मोकळा श्वास घेतला...


ही बातमी वाचा :