नवी दिल्ली : उत्तराखंडच्या जोशीमठमधील हिमकडा कोसळल्याने कहर निर्माण झाला आहे. दरम्यान, उत्तराखंड सरकारने हेल्प लाइन क्रमांक जाहीर केला आहे. अपघाताशी संबंधित माहितीसाठी आपण 1070 आणि 9557444486 वर कॉल करू शकता. देहरादून, हरिद्वार आणि ऋषिकेश येथे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लोकांना सखल भागातून काढले जात आहे. एनडीआरएफच्या तीन पथकांना दिल्लीहून पाठविण्यात आले आहे. एनडीआरएफकडून झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन केले जात आहे.


कोणत्याही प्रकारच्या अफवाकडे लक्ष देऊ नका, मुख्यमंत्र्यांचे आवाहन


जनतेने कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे लक्ष देऊ नये, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी केले आहे. जुने व्हिडिओ शेअर करू नका. एबीपी न्यूजशी बोलताना उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी याबाबतचे ताजे अपडेट सांगितले. ते म्हणाले की हिमकडा तुटल्यानंतर पाण्याची हानिकारक पातळी नियंत्रणात आहे. रेणी उर्जा प्रकल्प पूर्णपणे कोसळला असून तिथं काम करणाऱ्या लोकांच्या वाचण्याची शक्यता कमी आहे. तपोवन या दुसर्‍या उर्जा प्रकल्पाचेही नुकसान झाले आहे. तिथेही मदत व बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, घटनेनंतर सखल भागातील लोकांना सतर्क करण्यात आले आहे.


उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, पाणी पातळी वाढल्याने अनेकजण वाहून गेल्याची भीती


या घटनेशी संबंधित 10 मोठ्या गोष्टी




  1. जोशीमठपासून 25 कि.मी. अंतरावर हिमकडा तुटला

  2. आतापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट, मृतदेह बाहेर काढण्यात आले

  3. पैंग गावाच्या वरील भागातही ग्लेशियर फुटत आहे.

  4. ऋषी गंगा पॉवर प्रोजेक्टचे मोठे नुकसान

  5. तपोवन जलविद्युत प्रकल्प पूर्णपणे वाहून गेला

  6. पुरात 150 लोक वाहून गेल्याची भीती

  7. हरिद्वार आणि उत्तर प्रदेशच्या बिजनोरपर्यंत प्रशासनाचा इशारा

  8. NDRF ची तीन पथक उत्तराखंडला रवाना झाली आहेत

  9. पाणी रुद्रप्रयागपर्यंत पोहचले असून पाण्याचा प्रवाह कमी झालाय

  10. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली


उत्तराखंड हिमकडा कोसळून धरणाचा बांध फुटला, कुंभमेळ्याची तयारी करणाऱ्या हरिद्वारमध्ये अलर्ट