Uttarakhand Glacier Collapse LIVE:आतापर्यंत 18 मृतदेह सापडले, 202 जण बेपत्ता

पाण्याची पातळी वाढल्याने तपोवनमध्ये वीज प्रकल्प वाहून गेल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये अनेकजण वाहून गेल्याची भीती वर्तवली जात आहे. प्रशासन घटनास्थळी पोहोचलं असून मदत व बचावकार्य सुरू झालं आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 Feb 2021 01:34 PM

पार्श्वभूमी

जोशीमठ : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात ग्लेशियर (हिमकडा) कोसळल्याची घटना घडली आहे. जोशीमठच्या रेणीतील ऋषीगंगा प्रोजेक्टजवळ ग्लेशियर कोसळल्याची माहिती आहे. त्यामुळे पाण्याची पातळी वाढल्याने तपोवनमध्ये वीज प्रकल्प वाहून गेल्याची माहिती मिळत आहे....More

उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, आतापर्यंत 18 मृतदेह सापडले आहेत आणि बेपत्ता लोकांची संख्या 202 आहे. बोगद्यात 80 मीटर पर्यंतचा अडथळा हटवण्यात आला आहे, मशीन्स पुढे आहेत, संध्याकाळपर्यंत काही तरी यश मिळेल अशी आशा आहे.