प्रियकरासोबत पळाल्याने तरुणीवर भाऊ-वडील-काकांचा गँगरेप
एबीपी माझा वेब टीम | 29 Nov 2017 05:47 PM (IST)
एका नर्सिंग होममध्ये आपला भाऊ, वडील आणि दोन काकांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तिने केला आहे.
मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) : एकीकडे, कोपर्डीतील चिमुरडीच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा सुनावली गेली असतानाच उत्तर प्रदेशातून नात्यांना काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. प्रियकरासोबत पळून गेल्याच्या रागातून तरुणीवर तिचा सख्खा भाऊ, वडील आणि दोन काकांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप होत आहे. मुझफ्फरनगरमध्ये राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणीच्या आरोपांमुळे उत्तर प्रदेश हादरलं आहे. पोलिसांनी चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यूपीतील धानेदा गावात राहणारी 21 वर्षीय तरुणी त्याच गावातील 32 वर्षीय तरुणासोबत दोन वेळा पळून गेली होती. दोन्ही वेळा म्हणजे जुलै आणि ऑक्टोबर महिन्यात तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात अपहरणाची तक्रार नोंदवली. प्रकरण कोर्टात गेल्यावर तरुणीने प्रियकराच्या बाजूने साक्ष दिली. आपण मर्जीने त्याच्यासोबत गेल्याचं सांगितल्याने आरोपीची निर्दोष सुटका करण्यात आली.