UPSC NDA NA II and CDS II  Exam Date : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) आणि कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) तांत्रिक अडचणींची दखल घेत दोन्ही परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीत वाढ (Deadline Extended) केली आहे. 'एबीपी माझा'ने या संदर्भातील सर्वप्रथम बातमी देऊन विद्यार्थ्यांच्या अडचणी समोर आणल्या होत्या. त्यानंतर यूपीएससीने ही मुदतवाढ दिली आहे.

Continues below advertisement

यूपीएससीच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, NDA (II) आणि CDS(II) 2026 या परीक्षांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आता 11 जून 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस 9 जून होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आयोगाच्या वेबसाईटचे सर्व्हर डाऊन (UPSC Server Down) असल्यामुळे देशभरातील लाखो विद्यार्थी अर्ज करण्यापासून वंचित राहिले होते. विद्यार्थ्यांचा वाढता संताप आणि मुदतवाढीची मागणी लक्षात घेता आयोगाने अखेर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

UPSC Official Notice Details : जाणून घ्या नवीन सुधारित वेळापत्रक

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) जारी केलेल्या नवीन अधिकृत अधिसूचनेनुसार, सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

Continues below advertisement

नवीन अंतिम तारीख : इच्छुक आणि पात्र उमेदवार आता 11 जून रोजी संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत आपले ऑनलाईन अर्ज भरू शकतात.

अर्ज दुरुस्ती विंडो (Correction Window) : अर्ज सादर केल्यानंतर त्यात काही चुका सुधारण्यासाठी आयोगाकडून 12 जून ते 18 जून दरम्यान करेक्शन विंडो खुली केली जाईल.

NDA NA CDS II Exam Date : परीक्षा कधी होणार? 

अर्ज प्रक्रियेच्या तारखांमध्ये बदल झाला असला, तरी परीक्षेच्या तारखेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यूपीएससी कॅलेंडरनुसार एनडीए II आणि सीडीएस II या दोन्ही परीक्षा पूर्वघोषित वेळेनुसार 13 सप्टेंबर 2026 रोजीच देशभरातील विविध केंद्रांवर घेतल्या जाणार आहेत.

UPSC Server Down Issue : सर्व्हर डाऊनमुळे हजारो विद्यार्थी अडचणीत

यापूर्वी 9 जून रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने शेवटच्या 24 तासांत लाखो विद्यार्थ्यांनी वेबसाईटवर एकच गर्दी केली होती. परिणामी, यूपीएससीचे मुख्य सर्व्हर पूर्णपणे क्रॅश आणि डाऊन झाले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एका अर्जासाठी 1 ते 2 तास लागत होते, तर अनेकांचे पेमेंट अडकले होते. त्यातच यूपीएससीचा हेल्पलाईन क्रमांकही व्यस्त लागत असल्याने विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला होता. विद्यार्थ्यांनी दोन ते तीन दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आयोगाने तात्काळ पावले उचलत दोन दिवसांची वाढ करून दिली आहे.

How to Apply NDA CDS : कसा करायचा ऑनलाईन अर्ज?

अद्याप अर्ज करू न शकलेल्या उमेदवारांनी पुढील ऐनवेळची तांत्रिक गर्दी टाळण्यासाठी तात्काळ खालील सोप्या स्टेप्स फॉलो करून अर्ज करावा:

1. सर्वात आधी यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळाला (upsconline.nic.in किंवा upsc.gov.in) भेट द्या.2. होमपेजवर उपलब्ध असलेल्या 'One Time Registration (OTR)' प्रक्रियेद्वारे स्वतःची नोंदणी पूर्ण करा (जर आधी केली नसेल तर).3. त्यानंतर 'NDA II' किंवा 'CDS II' 2026 च्या परीक्षा अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.4. आवश्यक ती सर्व वैयक्तिक, शैक्षणिक माहिती आणि कागदपत्रे/फोटो अचूक अपलोड करा.5. अर्ज फी ऑनलाईन माध्यमातून जमा करून अंतिम फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंटआऊट काढून ठेवा.

ही बातमी वाचा: