बंगळुरु :  बंगळुरुच्या रस्त्यावर मागच्या शुक्रवारी अचानक एक जलपरी अवतरली. आता तुम्ही म्हणाल, जलपरी आणि ती देखील रस्त्यावर?  हो... तर हे बंगळुरूमधल्या रस्त्यावरच्या खड्ड्यांविरोधात स्थानिक कलाकारांनी पुकारलेलं अनोखं आंदोलन होतं.


स्ट्रीट आर्टिस्ट बादल नंजुनदासस्वामी आणि कन्नड अभिनेत्री सोनू गोडवा यांनी हे अनोखं आंदोलन केलं. यासाठी बंगळुरुमधल्या एका खड्ड्यातल्या पाण्यात निळा रंग टाकण्यात आला. खड्ड्याला समुद्राचं रुप देण्यात आलं आणि त्यानंतर सोनू गोडवा यांनी खास जलपरीच्या अवतारात इथं आंदोलन केलं.

बंगळुरुमध्ये रस्त्यांची अवस्था फारची बिकट आहे. त्यामुळे बरेच अपघात झाले आहेत. 10 ऑक्टोबरला दुचाकीवरुन जाणाऱ्या एका 21 वर्षीय युवतीचा खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. अशाच एका अपघातात 54 वर्षीय व्यक्तीला देखील आपले प्राण गमवावे लागले होते. एवढे अपघात होऊनही प्रशासन आजही रस्त्यांबाबत अगदी उदासिन आहे. त्यामुळेच हे अनोखं आंदोलन करुन सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

या अनोख्या आंदोलनामुळं प्रशासनामध्ये काही फरक पडला की नाही माहीत नाही, मात्र या आंदोलनाची बंगळुरुत चांगलीच चर्चा रंगली.

VIDEO :