Bhagwat Karad Indigo Flight : भाजपचे खासदार भागवत कराड (BJP MP Bhagwat Karad)  यांना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यात आलं होतं. भागवत कराड यांच्याकडे मोदी केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थ राज्यमंत्रिपद देण्यात आलेय. केंद्रीय मंत्री असलेले भागवत कराड पेशानं एक डॉक्टर आहेत. विमान प्रवासात केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवत एका व्यक्तीचा जीव वाचवलाय. कराड त्या प्रवाशासाठी देवदूत ठरले. कराडांच्या या कृतीचं सर्वच स्थरातून कौतुक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भागवत कराड यांचं कौतुक केलं आहे. विमानत घडलेला प्रसंग भागवत कराड यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलाय. इंडिगोनीही ट्विट करत भागवत कराड यांचं कौतुक केलेय.


डॉक्टर भागवत कराड सोमवारी इंडिगोच्या (Indigo Airlines) विमानातून दिल्लीवरुन मुंबईला प्रवास करत होते. त्यावेळी अचानक कराड यांच्या मागील सीटवरील प्रवाशी प्रकृती बिघडली. विमानातील क्रू मेंबर्सने उद्घोषणाकरुन ऑन बोर्ड कोणी डॉक्टर असेल तर मदत करावी, अशी विनंती केली. हे ऐकताच केंद्रीय मंत्री डॉक्टर कराड यांनी लगेच त्या प्रवाशाजवळ जाऊन प्रथमोपचार देत त्याचा जीव वाचवला. भागवत कराड यांनी हा प्रसंग आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिलाय. कराडांच्या या कृतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करत कौतुक केलं आहे.


कराड यांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलेय?
प्रवास कर्तव्यदक्षतेचा..... !!
काल प्रवासादरम्यान इंडिगो फ्लाइट IndiGo मध्ये 12 A सीट वर बसलेल्या एका प्रवाशाला अचानक गंभीर आरोग्य समस्या उद्भवली व तो कोसळून पडला. मी समोरच्या सीट वर होतो विमानात अचानक कुजबुज सुरु झाली आणि मला कळाले. एका क्षणाचा देखील विलंब न करता, कुठलाही मिनिस्ट्री प्रोटोकॉल विचारात न घेता मी एक डॉक्टर म्हणून त्याला ताबडतोड सुश्रुषा केली. आपल्या अनुभवामुळे जेव्हा एखाद्या गरजूला मदत होते तेव्हा मिळणारे समाधान हे खूप मोठे असते, याची काल परत एकदा अनुभूती घेतली. आपली भारतीय संस्कृती आपल्याला कायमच हे शिकवते. " एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ "  संतांची हि शिकवन कायम लक्षात ठेवा व मदतीसाठी पुढाकार घ्या.



केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी दाखवलेल्य कर्तव्यदक्षतेबाबत इंडिगो एअरलाईन्सने ट्विट करत त्यांचं कौतुक केलं आहे. तसेच गरजेच्यावेळी धावून आल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.   






पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिगोच्या या ट्वीटला रिप्लाय देत कराड यांचं कौतुक कलं आहे. ‘ते मनाने कायमच डॉक्टर आहेत. माझे सहकारी डॉ. भागवत कराड यांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे,’ असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय.