नवी दिल्ली : ब्रिटीशांची परंपरा मोडत मोदी सरकारकडून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पहिल्यांदाच रेल्वे आणि सर्वसामान्य अर्थसंकल्प एकत्र मांडला. जेटलींनी 2017- 18 या वर्षासाठी 21 लाख 47 हजार कोटींचं बजेट सादर केलं. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे आगामी काळात कोणत्या गोष्टी स्वस्त होणार आणि कोणत्या गोष्टी महाग होणार यावर एक नजर टाकूया काय स्वस्त? खनिज इंधन,  खनिज तेल तयार चामडं एलएनजी (लिक्विफाईड नॅचरल गॅस) बायो गॅस, बायो मिथेनचा वापर असणाऱ्या वस्तू एलईडी लाईट सिल्व्हर फॉईल टेलिकॉम इंटरनेट वापरासाठीच्या ऑप्टिकल फायबर सोलर पॅनलसाठीचा कच्चा माल पीओएस मशिन फिंगर स्कॅनर, मायक्रो एटीएम, आयरिस स्कॅनर हिरे आणि महागड्या खड्यांपासून बनलेले दागिने काय महाग? मोबाईल वॉटर प्युरिफायर पेपर रोल पानमसाला, जर्दा बिडी सिगरेट तंबाखूजन्य पदार्थ काजू, तळलेले नमकीन पदार्थ चांदीची नाणी आणि चांदीचे दागिने