वर्दीवर असलेल्या महिला पोलिसावर अॅसिड हल्ला
एबीपी माझा वेब टीम | 24 Dec 2016 11:39 AM (IST)

वेल्लोर (तामिळनाडू) : वर्दीवर असलेल्या महिला पोलिस कॉन्स्टेबलवर अॅसिड हल्ला झाल्याची घटना तामिळनाडूतील वेल्लोरमध्ये घडली आहे. या घटनेत महिला पोलिस जखमी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. वेल्लोर जिल्ह्याच्या तिरुप्पट्टूरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. लावण्या असं महिला पोलिसाचं नाव आहे. या दुर्दैवी घटनेत लावण्या यांचा चेहरा आणि उजवा हात गंभीर भाजला आहे. त्यांना ख्रिश्चन मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. हल्ल्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.