Uddhav Thackeray Ayodhya Visit LIVE | उद्धव ठाकरेंकडून सहकुटुंब रामलल्लांचं दर्शन

25 नोव्हेंबर 2018 रोजी उद्धव ठाकरे अयोध्येला गेले होते. लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू करण्यापूर्वी उद्धव यांनी या दौऱ्याचे आयोजन केले होते. राम मंदिर हा शिवसेना-भाजप युतीचा लोकसभा निवडणुकीपूर्वीचा महत्त्वाचा अजेंडा होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर गेले होते.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Mar 2020 04:56 PM
उद्धव ठाकरेंकडून सहकुटुंब रामलल्लांचं दर्शन, राम मंदिर दर्शनासाठी शिवसेनेकडून एक कोटींची घोषणा, शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं नसल्याचा पुनरूच्चार
शिवसेनेच्या वतीने राम मंदिर निर्मितीसाठी 1 कोटींचा निधी; अयोध्या दौऱ्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
महाराष्ट्रातील रामभक्तांसाठी महाराष्ट्र भवन निर्मितीचा मानस : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
शरयू नदीची आरती करण्याची इच्छा होती : उद्धव ठाकरे
LIVE | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब अयोध्येत दाखल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब लखनौहून अयोध्येच्या दिशेने रवाना, रामलल्लाचं दर्शन घेणार
भाजपने चिंता करू नये आमचं सरकार पाच वर्ष पूर्ण करेल : संजय राऊत
आमचं रक्त खवळलं म्हणून आम्ही अयोध्येतील कलंक धुवून काढला, बाबरी पाडल्याची जबाबदारी घेतली : संजय राऊत
गेल्या 30 वर्षांत आम्ही राममंदीरासाठी निःस्वार्थीपणे काम केलं : संजय राऊत
गेल्या 30 वर्षांत आम्ही राममंदीरासाठी निःस्वार्थीपणे काम केलं : संजय राऊत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवरून अयोध्या दौऱ्यासाठी रवाना
उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला महाविकास आघाडीच्या नेत्यांचीही हजेरी, काँग्रेस नेते आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार अयोध्येत दाखल
काँग्रेस आणि राष्ट्रवादीने राम मंदिर निर्माणामध्ये हातभार लावला पाहिजे, असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. संजय राऊत अयोध्येत बोलत होते. दरम्यान आज शरयू आरतीचा कार्यक्रम होणार नसल्याचंही राऊत यांनी पत्रकार परिषेदेत सांगितलं आहे.
हिंदू महासभेने उद्धव ठाकरेंच्या अयोध्यावारीला विरोध केला आहे. सरकार स्थापन झाल्यापासून उद्धव यांच्या नियतीमध्ये फरक पडलाय, शिवाय ते मुस्लिमांना आरक्षण देत आहेत. असं म्हणत हिंदू महासभेने ठाकरेंच्या अयोध्यावारीला विरोध दर्शवला आहे.
राम मंदिर बांधण्यासाठी बनवण्यात आलेल्या ट्रस्टचे अध्यक्ष नित्य गोपाल दास यांनी उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचं स्वागत केलं आहे. बाळासाहेबांनी नेहमीच मंदिराच्या उभारणीसाठी पाठिंबा दिला. आता त्यांच्या मुलाचेही सहकार्य मिळत असल्याचं गोपाल दास यांनी म्हटलं आहे.
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्य़ावर जाणार आहेत. महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस झाल्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्येत रामजन्मभूमीचं दर्शन घेणार आहेत. दरम्यान, शिवसेनेनं हिंदुत्वाची कास सोडली नसल्याचं अधोरेखित करण्यासाठी हा अयोध्या दौरा होत असल्याची चर्चा आहे.

पार्श्वभूमी

अयोध्या : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्य़ावर जाणार आहेत. महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस झाल्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्येत रामजन्मभूमीचं दर्शन घेणार आहेत. दरम्यान, शिवसेनेनं हिंदुत्वाची कास सोडली नसल्याचं अधोरेखित करण्यासाठी हा अयोध्या दौरा होत असल्याची चर्चा आहे.


 


नियोजित दौऱ्यानुसार उद्धव ठाकरे हे शरयू तीरावर आरती करणार होते. पण उत्तर प्रदेश सरकारचा जास्त गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचा निर्णय झाला आहे. परंतु, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शरयू तीरावराचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसैनिकांच्या हिरमोड झाला आहे. त्यामुळे प्रभू रामचंद्राचं दर्शन घेऊन उद्धव ठाकरे मुंबईला रवाना होतील.


 


कसा असणार उद्धव ठाकरेंचा दौरा?


 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत दुपारच्या दरम्यान दाखल होतील त्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिक आधीच अयोध्येत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद होईल, त्यानंतर साडेचार वाजता ते रामलल्लाचे दर्शन घेतील. पर्यावर मंत्री आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, कॅबिनेटमधील काही मंत्री आणि शिवसेनेचे नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.


 


अयोध्येत शिवसैनिकांची गर्दी आणि जोरदार होर्डिगबाजी


 


अयोध्येत उद्धव ठाकरे प्रभू रामचंद्राच्या दर्शनसाठी येत असल्यामुळे अयोध्यानगरीत शिवसेनेचं जोरदार शक्तिप्रदर्शन पाहायला मिळत आहे. अयोध्येच्या प्रत्येक चौकाचौकात मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे होर्डिंग लावण्यात आले आहेत. लखनऊ विमानतळापासून ते अयोध्यानगरीपर्यंत शिवसेनेचे होर्डिंग पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रात विविध भागासह दिल्ली उत्तर प्रदेशातले शिवसैनिक मोठ्या प्रमाणात अयोध्येत दाखल झाले आहेत. मुंबईहून आलेल्या शिवसैनिकांचं अयोध्यामध्ये ढोल ताशा आणि फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आलं.


 


दरम्यान, 25 नोव्हेंबर 2018 रोजी उद्धव ठाकरे अयोध्येला गेले होते. लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू करण्यापूर्वी उद्धव यांनी या दौऱ्याचे आयोजन केले होते. राम मंदिर हा शिवसेना-भाजप युतीचा लोकसभा निवडणुकीपूर्वीचा महत्त्वाचा अजेंडा होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर गेले होते.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.