काश्मिरच्या पुलवामामध्ये हिजबुलच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
एबीपी माझा वेब टीम | 30 Jul 2017 11:10 AM (IST)
जम्मू काश्मिरच्या पुलवामामध्ये सैन्यदलाला आणखी एक यश हाती लागलं आहे. पुलवामा भागात झालेल्या चकमकीत सैन्यानं दोन आतंकवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.
श्रीनगर : जम्मू काश्मिरच्या पुलवामामध्ये सैन्यदलाला आणखी एक यश हाती लागलं आहे. पुलवामा भागात झालेल्या चकमकीत सैन्यानं दोन आतंकवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. शनिवारी रात्री सैन्यदलाला या परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. पुलवामा भागात लपलेल्या आतंकवाद्यांशी सैन्याशी चकमक सुरु होती. यात हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आलं आहे. खात्मा कऱण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावं अब्दुल मंजूर आणि इरफान शेख असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान या चकमकीनंतर या परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सैन्यानं या परिसराला वेढा घातला आहे. तसंच आसपासच्या परिसरात आणखी दहशतवादी लपले आहेत का याचाही शोध सुरु आहे.