श्रीनगर : दक्षिण कश्मीरमधल्या शोपियान जिल्ह्यातील इमाम साहब सेक्टरमध्ये सुरक्षाबल आणि दहशदवाद्यांमध्ये आज सकाळपासून चकमकी सुरु आहेत. सकाळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश मिळाले आहे.


शोपियान जिल्ह्यातील इमाम साहिब परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती काल रात्री उशीरा लष्कराला मिळाली होती. त्यानंतर ज्या ठिकाणी दहशतवादी लपले होते. त्या परिसराला लष्कराने घेराव घातला. तिथून पळून जाण्यासाठी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला. जवानांनीदेखील त्याला प्रत्युत्तर दिले. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

दहशतवाद्यांना मारल्यानंतर परिसरातील लोकांनी हिंसाचार सुरु केला. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जवानांना बळाचा वापर करावा लागला. सध्या सावधानी म्हणून प्रशासनाने शोपियान जिल्ह्यात इंटरनेटसह अन्य सेवा बंद ठेवल्या आहेत.