पणजी : सेल्फीचा मोह आणि समुद्राच्या पाण्याशी खेळणं एका तरुणाला महागात पडलं आहे. कातळावर बसलेल्या तीन मित्रांपैकी एक जण मोठ्या लाटेसह समुद्रात वाहून केला. गोव्याच्या सीकेरी किनाऱ्यावर ही रविवारी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.


मूळ आणि तामिळनाडूतील असणारे चार मित्र गोव्याला फिरण्यासाठी आले होते. सूर्योदय पाहण्यासाठी ते आग्वाद किल्ल्याखालील सीकेरी येथील खडकाळ भागात गेले होते. चौघांपैकी तीन जण खडकाळ भागात बसून सेल्फी आणि लाटांचा आनंद घेत होते. तर चौथा मित्र त्यांचा व्हिडीओ बनवत होता. त्यावेळी आलेल्या मोठ्या लाटेने तिघांपैकी एका तरुणाला खेचून नेलं. इतर दोघं एका खडकाच्या पाठीशी ढकलले गेल्याने त्यांचा जीव थोडक्यात वाचला. धडपड करुन ते समुद्राबाहेर पडण्यात यशस्वी झाले.

धक्कादायक म्हणजे आपला मित्र वाहून गेला आहे, याची कल्पनाही या दोघांना नव्हती. बराच वेळपर्यंत त्यांनी आपल्या मित्राला आवाज दिला. मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. शशीकुमार वासन असं 33 वर्षीय मृत तरुणाचं नाव असून तो तामिळनाडू येथील होता. काही वेळाने त्याचा मृतदेह वाहून किनाऱ्यावर आला. पोलिसांनी त्याचा मृतदेह गोमेकॉच्या शवागृहात पाठवून पुढील तपास सुरु आहे.

सेल्फीच्या नादात तरुणाचा मृत्यू
तर दुसरीकडे बागा समुद्रकिनारी अशाचप्रकारची घटना घडली आहे. कळंगुटचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मूळचे मंगळुरुमधील असलेले मित्र शनिवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास बागा येथील किनाऱ्यावर आले होते. यापैकी तिघे बागा किनाऱ्याच्या टोकास जाऊन जवळच्या खडकाळ भागात गेले होते. तेथे उभे राहून सेल्फी घेत असताना एका जोरदार लाटेच्या तडाख्याने तिघेही समुद्रात फेकले गेले. त्यातील दोघे धडपड करुन समुद्राबाहेर पडण्यात यशस्वी झाले मात्र एकजण समुद्रात वाहून गेला. काही वेळाने त्याचा मृतदेह वाहून किनाऱ्यावर आला. मृताचे नाव दिनेश कुमार रंगनाथन आहे.

अकोल्यातील दोघांचे मृतदेह सीकेरीत सापडले होते



गेल्या आठवडयात महाराष्ट्रातील अकोलामधील पाच जण कळंगुट समुद्रात बुडाले होते, त्यातील दोघांचे मृतदेह तिसऱ्या दिवशी सीकेरी किनाऱ्यावरील खडकाळ भागात सापडले होते. त्यामुळे गोव्यातील समुद्रात बुडून मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता सात जणांवर पोहोचली आहे.

पाहा व्हिडीओ


पाहा व्हिडीओ