श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात सकाळपासून भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी स्थानिकांच्या दगडफेकीला प्रत्युत्तर देताना पोलिसांकडून तीन नागरिकांचा मृत्यू झाला.


स्थानिकांकडून भारतीय जवानांवर दगडफेक करण्यात आली. यावेळी भारतीय सैन्यानं प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत तीन नागरिकांचा मृत्यू झाला. एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे.

चादुरा परिसरात दहशतवादी लपल्याची बातमी मिळाल्यानंतर पहाटे सुरक्षा दलांनी या परिसराला घेराव घातला आणि संपूर्ण परिसर रिकामा केला. सुरक्षा दलांकडून शोध मोहिम सुरू असताना दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरूवात केली. त्यानंतर भारतीय सैन्यानेही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं.