नवी दिल्ली : रेल्वेतील एक लाख नव्या पदांच्या भरतीसाठी देशभरातून तब्बल 2 कोटी अर्ज आले आहेत. ऑनलाईन नोंदणीसाठी अजून पाच दिवस बाकी आहेत. त्यामुळे आणखी अर्ज येतील, यात शंका नाही.


ग्रुप सी आणि ग्रुप डीसाठी 90 हजार पदं, तर रेल्वे सुरक्षा दलासाठी 9 हजार 500 पदांसाठी ऑनलाईन परीक्षा होत आहेत.

रेल्वे मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, “एक लाख पदांसाठी आतापर्यंत दोन कोटींहून अधिक अर्ज आले आहेत आणि ही संख्या आणखी वाढू शकते. कारण अजून पाच दिवस बाकी आहेत. लोको पायलट आणि टेक्निशियनच्या पदांसाठीच 50 लाखांहून अधिक ऑनलाईन अर्ज आले आहेत. लोको पायलट आणि टेक्निशियनसाठी 26 हजार 502 आणि ग्रुप डीचे 62 हजार 907 पदं भरली जाणार आहेत.”

काही दिवसांपूर्वीच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरवरुन सांगितले होते की, “रेल्वेत लवकरच एक लाख पदं भरली जाणार आहेत. यामध्ये 9500 पदं ही रेल्वे सुरक्षा दलाची असतील. त्यातील 50 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित असतील.”

संबंधित बातमी : भारतीय रेल्वेत 90 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया : रेल्वेमंत्री