अगरताळा : स्वातंत्र्यदिनानिमित्तानं केलेलं भाषण दूरदर्शन आणि आकाशवाणीनं प्रसारित केलं नसल्याचा आरोप त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी केला आहे. तसेच भाषणाचा मजकूर बदलल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री भाषण करतात, हे भाषण दूरदर्शन आणि आकाशवाणीव्दारे प्रसारीत केलं जातं. मात्र, भाषणातील काही मजकूर बदलण्यात यावा, तो बदलला तरच भाषण प्रसारित केलं जाईल, अशा आशयाचं पत्र दूरदर्शन आणि आकाशवाणीनं सरकार यांना आधीच पाठवलं होतं.
दुसरीकडे त्रिपुरामध्ये डाव्या पक्षांचं सरकार आहे, त्यामुळेच सरकारी प्रसारमाध्यमांकडून ही गळचेपी करण्यात येत असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युन्सिट पक्षाने केला आहे.
मुख्यमंत्र्यांचं भाषण 12 ऑगस्ट रोजी रेकॉर्ड करण्यात आलं होतं. यानंतर रेडिया आणि दूरदर्शनने त्यांना भाषणात बदल करण्यास सांगितलं होते. पण मुख्यमंत्र्यांनी त्यात बदल न केल्याने त्यांचं भाषणच प्रसारित करण्यात आलं नाही.
दरम्यान, या प्रकरणावरुन माकपाने पंतप्रधान मोदींनाच लक्ष्य केलं आहे. स्वातंत्र्यदिनी त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचं भाषण प्रसारित न केल्याबद्दल माकपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सीताराम येच्युरी यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
देशात सध्या हुकूमशाही आणि अघोषित आणीबाणी लागू असल्याचं येच्युरींनी म्हटलं आहे.
स्वातंत्र्यदिनाचं माझं भाषण प्रसारित केलं नाही, त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचा आरोप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Aug 2017 03:50 PM (IST)
स्वातंत्र्यदिनाचं आपलं भाषण दूरदर्शन आणि आकाशवाणीनं प्रसारित केलं नसल्याचा, आरोप त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -