त्रिपुरा : त्रिपुरामध्ये भाजपने जवळजवळ एकहाती सत्ता मिळवली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कारण येथे भाजपने 40 जागांवर आघाडी घेतली आहे. तर गेली 25 वर्ष सत्तेत असलेली सीपीएम फक्त 19 जागांवर आघाडीवर आहे.
गेल्या 20 वर्षापासून त्रिपुराचे मुख्यमंत्री असलेले माणिक सरकार सध्या पिछाडीवर असल्याचं वृत्त समजतं आहे. त्यामुळे सीपीएमसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, आता त्रिपुरामध्ये मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगू लागली आहे. भाजपचे त्रिपुरा अध्यक्ष विप्लव देव यांचं नाव सध्या मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर आहे. भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येईल.