नवी दिल्ली : तिहेरी तलाक विधेयक तिसऱ्यांदा लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. हे विधेयक आता राज्यसभेत पाठवण्यात येणार आहे. लोकसभेत विधेयकाच्या बाजूने 303 मतं पडली तर विधेयकाच्या विरोधात 82 मतं पडली. त्यानंतर विधेयकात संशोधन करण्यासाठी मतदान घेण्यात आले. त्यामध्ये विधेयकाच्या बाजूने 303 मतं पडली तर विधेयकाच्या विरोधात 78 मतं पडली.

दरम्यान, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, टीएसआर आणि वायएसआर या पक्षांनी या विधेयकाला विरोध करत सभात्याग केला. विशेष म्हणजे भाजपचा सहयोगी पक्ष असलेल्या जेडीयूच्या (जनता दल युनायटेड) खासदारांनीदेखील विधेयकाला विरोध करत सभात्याग केला.

भाजपला दणका; तीन तलाक विधेयकाला विरोध करत नितीश कुमारांच्या जेडीयूचा सभात्याग

यावेळी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी तिहेरी तलाक विधेयकाबाबत संशोधन सादर केले. परंतु सभागृहाने हे संशोधन फेटाळले. त्यासोबतच एन. के. प्रेमचंद्रन यांनी ठेवलेला संशोधन प्रस्तावदेखील सभागृहाने फेटाळला.

Triple Talaq Bill : इस्लाममध्ये लग्न म्हणजे कॉन्ट्रॅक्ट, त्याला सात जन्मांचा मुद्दा बनवू नका : असदुद्दीन ओवेसी

लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकासाठी मतदान घेण्याची मागणी विरोधी पक्षानेच केली होती. त्यानंतर लोकसभेच्या सभापतींनी त्यास मंजुरी दिली. सभागृहातील सर्व सदस्यांनी मतपत्रिकेद्वारे मतदान केले. त्यामध्ये 303 मत विधेयकाच्या बाजूने पडली, तर 82 मतं विरोधात पडली. त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी विधेयक मंजूर झाल्याची घोषणा केली.