Switzerland Tour : स्वित्झर्लंडला फिरायला जाण्याचा विचार करणाऱ्या भारतीयांसाठी (India) महत्त्वाची बातमी आहे. स्वित्झर्लंडच्या दूतावासाने पुढील काही महिन्यांत भारतीयांचे शेंजेन व्हिसा अर्ज रद्द केले आहेत. नवी दिल्लीतील स्वित्झर्लंडच्या दूतावासाने अनुशेषामुळे (Backlog) ऑक्टोबरपर्यंत भारतीय टूर गटांसाठी शेंजेन व्हिसा अर्ज रद्द केले आहेत. मोठ्या प्रमाणात प्रलंबित अर्जाचं कारण देत नवी दिल्लीतील स्विस दूतावासाने भारतीय ग्रुप टूरसाठीचे व्हिजा अर्ज ऑक्टोबरपर्यंत रद्द केले आहेत.
स्वित्झर्लंडला जायचा प्लॅन करताय?
SchengenVisaInfo.com च्या वृत्तानुसार, व्हिसा प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ देण्यासाठी टूर ऑपरेटरना समूह सहलींचे वेळापत्रक पुन्हा शेड्यूल करण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नवी दिल्लीतील स्विस दूतावासाने प्रलंबित अर्जांच्या मोठ्या अनुशेषाचे (Backlog) कारण देत भारतीय टूर गटांसाठीचे शेंजेन व्हिसा अर्ज ऑक्टोबरपर्यंत निलंबित केले आहेत.
भारतीयांचे शेंजेन व्हिसा अर्ज ऑक्टोबरपर्यंत रद्द
दरम्यान, टूर ऑपरेटर्सने या निर्णयावर असंतोष आणि नाराजी व्यक्ती केली आहे. देशाबाहेरील ग्रुप टूर हे टूर ऑपरेटर्सचं महत्त्वाचं उत्पन्नाचं साधन आहे. यातूम टूर आयोजकांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो. पण आता ऑक्टोबरपर्यंत व्हिसा अर्ज रद्द करण्यात आल्याने टूर ऑपरेटर्सना भारतीयांसाठी स्वित्झर्लंड टूर प्लॅन करता येणार नाही. परिणामी या काळात त्यांना या टूरमधून उत्पन्न मिळणार नसल्याने टूर ऑपरेटर्स नाराज आहेत.
शेंजेन व्हिसा म्हणजे काय?
शेंजेन व्हिसा हा शेंजेन क्षेत्रातील देशामध्ये प्रवासासाठीचं आवश्यक कागदपत्र आहे. शेंगेन क्षेत्रामध्ये 27 युरोपीय देशांचा समावेश आहे. या देशांमध्ये प्रवास करण्यासाठी गैर-युरोपीय नागरिकांना शेंजेन व्हिसा आवश्यक असतो.
शेंजेन व्हिसाबाबत अधिक माहिती
गैर-युरोपियन देशाचे नागरिक असल्यास तुम्ही शेंजेन व्हिसासाठी पात्र ठरता. शेंजेंड व्हिसा कोणत्याही संबंधित व्यक्तीला 180 दिवसांच्या कालावधीत आणि 90 दिवसांपेक्षा जास्तीच्या कालावधीच्या शेंजेन क्षेत्रामध्ये लहान आणि तात्पुरत्या मुक्कामासाठी किंवा प्रवासासाठी देण्यात येतो. एका शेंगेन राज्याने जारी केलेला व्हिसा कोणत्याही शेंगेन राज्यात प्रवास करण्यासाठी वैध ठरतो, पण संबंधित व्यक्तीने मुख्य गंतव्यस्थानाच्या देशातून व्हिसासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
शेंजेन क्षेत्रातील देशांची यादी
शेंजेन व्हिसामध्ये ऑस्ट्रिया, बेल्जियम, क्रोएशिया, झेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, एस्टोनिया, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, आइसलँड, इटली, लॅटव्हिया, लिकटेंस्टीन, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, माल्टा, नेदरलँड, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, स्लोव्ह, स्लोव्हेनिया, शेंगेन सदस्य राष्ट्रे आहेत. तसेच स्लोव्हेनिया, स्पेन, स्वीडन आणि स्वित्झर्लंड या देशांचा समावेश आहे.