केबलसेवा स्वस्त करण्यासाठी ट्रायचा पुढाकार
एबीपी माझा वेब टीम | 12 Oct 2016 09:51 AM (IST)
मुंबई : केबलसेवा माफक दरात ग्राहकांना मिळावी यासाठी ट्रायने 100 फ्री टू एअर वाहिन्या फक्त 130 मध्ये देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. सध्या दूरदर्शनसह काही खाजगी वाहिन्या डीडी डायरेक्ट प्लसच्या माध्यमातून मोफत दाखवल्या जातात. याच वाहिन्या आता केबलवरही पाहता येणार आहेत. त्यामुळे केबलसाठीचा महिन्याचा खर्च कमी होण्याची शक्यता आहे. दूरसंचार नियमन प्राधिकरण अर्थातच ट्रायने मांडलेल्या प्रस्तावात 130 रुपयांमध्ये 100 टीव्ही चॅनल देण्याचा विचार आहे. तसंच आपल्या आवडीच्या चॅनेलचाही समावेश केबलवर करता येणार आहे. एचडी चॅनलचाही पर्याय ग्राहकांना निवडता येणार आहे. ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. केबलवर बऱ्याचदा आपल्याला नको असलेल्या चॅनलसाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात. त्यावर उपाय म्हणून ट्रायने हा प्रस्ताव मांडला आहे. फक्त फ्री टू एअर चॅनलचा पर्याय निवडल्यास केबल ऑपरेटरला 130 रुपयांपेक्षा जास्त रक्कम आकारता येणार नाही. यात सर्व करही अंतर्भूत असतील.