खऱ्या बंदुकीला खेळण्यातली बंदूक समजून चिमुकलीचा आईवर गोळीबार
एबीपी माझा वेब टीम | 18 Jun 2018 11:16 AM (IST)
घराबाहेर मुलीच्या आईलाच ही बंदूक सापडली होती. मात्र ही बंदूक खेळण्यातली असावी असं समजून आईनं ती बंदूक आपल्या मुलीला खेळायला दिली.
कोलकाता: खऱ्या बंदुकीला खेळण्यातली बंदूक समजून एका लहान मुलीनं चक्क आपल्या आईवर चुकून गोळी झाडली. ही धक्कादायक घटना कोलकात्यात घडली. घराबाहेर मुलीच्या आईलाच ही बंदूक सापडली होती. मात्र ही बंदूक खेळण्यातली असावी असं समजून आईनं ती बंदूक आपल्या मुलीला खेळायला दिली. मुलीने खेळता-खेळता बंदुकीचा ट्रिगर दाबला आणि त्यातून गोळी सुटली. ती गोळी थेट आईच्या पाठीला लागली. महिलेवर सद्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोलकाताच्या हुबळी भागात ही घटना घडली आहे. मात्र घराबाहेर लोडेड बंदूक कशी काय आढळली, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, बंदुकीतून सुटलेल्या गोळीने महिलेला गंभीर इजा झाली आहे. मुलगी खेळत होती, तेव्हा बंदुकीतून गोळी लगेचच सुटली आणि घरात बसलेल्या आईला लागली. याप्रकाराने मुलगीही हादरली असून तिला धक्का बसला आहे. VIDEO: