Coronavirus Cases Today in India : देशात कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. त्याचबरोबर ओमायक्रॉनचे (Omicron) रुग्ण देखील वाढताना दिसत आहेत. गेल्या 24 तासात देशात 1 लाख 41 हजार 986 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 285 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत देशात 3 हजार 71 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आडेवारी जाहीर केली आहे.


देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये देखील झपाट्याने वाढ होत आहे. आत्तापर्यंत देशात कोरोनामुळे 4 लाख 83 हजार 463 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर आत्तापर्यंत 3 कोटी 44 लाख 12 हजार 740 नागरिक कोरोनातून मुक्त झाले आहेत. सध्या देशात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ही 4 लाख 72 हजार 169 झाली आहे. दरम्यान, देशात सध्या वेगाने लसीकरण देखील सुरू आहे. 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांना देखील लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे लसीकरण दिवसेंदिवस वाढत आहे. आत्तापर्यंत देशात 150 कोटींहून अधिक लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 90 लाख 59 हजार 360 लसींचे डोस देण्यात आले आहेत. एकूण लसींचे डोस हे 150 कोटी 61 लाख 92 हजार 903 डोस दिले आहे. देशातील 91 टक्क्यांहून अधिक प्रौध लोकसंख्येला किमान 1 डोस तरी देण्यात आला आहे. तर 66 टक्को लोकांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे. तर 15 ते 17 वयोगटातील 22 टक्के मुलांना लसीकरणाचा डोस देण्यात आला आहे. 



भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) दिलेल्या माहितीनुसार, काल भारतात कोरोनाच्या 15 लाख 29 हजार 948 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. ओमायक्रॉनचा विचार केला तर देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 3 हजार 71 रुग्ण आढळले आहेत. तर 1 हजार 203 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशात जवळपास 27 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. सर्वांधीक ओमायक्रॉनचे रुग्ण हे  महाराष्ट्रात असून, त्यानंतर दिल्लीचा नंबर लागतो.







 


राज्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शुक्रवारी तब्बल  40 हजार 925 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 14, 256 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात शुक्रवारी एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही. आतापर्यंत 876 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 435 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.  शुक्रवारी मुंबईत 20 हजार 971  रुग्णांची नोंद झाली. मागील काही दिवसांपासून हजारांच्या तुलनेत वाढणारी रुग्णसंख्या शुक्रवारी फक्त 790 ने वाढली होती. त्यामुळे बाधितांच्या संख्या वाढ स्थिरावल्याचे समोर आलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या: