मुंबई : पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा महत्त्वाच्या ठिकाणी वापरण्याचा उद्या (गुरुवार 15 डिसेंबर 2016) शेवटचा दिवस आहे. त्यानंतर रुग्णालय, विमानतळ, पेट्रोल पंप, दूधकेंद्र अशा कुठल्याच ठिकाणी जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर गैरसोय टाळण्यासाठी जीवनावश्यक ठिकाणी जुन्या नोटा स्वीकारल्या जात होत्या. मात्र या मुदतीचाही आता शेवट होणार आहे.

मेट्रो, बस आणि रेल्वेमध्ये पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा 10 डिसेंबर 2016 पासूनच स्वीकारल्या जात नाहीयेत. एक हजारच्या नोटा 24 नोव्हेंबरपासून सरकारने बाद ठरवल्या (महत्त्वाच्या ठिकाणीही स्वीकारल्या जात नाहीत, फक्त 30 डिसेंबरपर्यंत बँकेत जमा करण्याची परवानगी).

तुमच्याकडे पाचशे किंवा हजारच्या जुन्या नोटा असतील, तर 30 डिसेंबरपर्यंत तुम्ही तुमच्या बँकेत त्या जमा करु शकता. अन्यथा प्रतिज्ञापत्रासह 31 मार्चपर्यंत आरबीआयकडे तुम्ही या नोटा बदलू शकता.

15 डिसेंबर 2016 नंतर इथे 500च्या जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत:

1. केंद्र सरकार आणि राज्य सरकारी शाळा, महानगरपालिकेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांच्या फी


2. केंद्र आणि राज्य सरकारच्या महाविद्यालयातील फी

3. ग्राहक सहकारी भांडार

4. प्री-पेड मोबाइलच्या टॉप अपसाठी


5. पाणी बिल आणि वीज बिल


6. सरकारी रुग्णालयं

7. विमानतळावरील तिकीट

8. दूध केंद्र

9. स्मशानभूमी

10. पेट्रोल पंप

11. मेडिकल

12. एलपीजी गॅस सिलेंडर

13. पुरातत्व विभागाच्या वास्तू (उदा. ताजमहल, लालकिल्ला, अजिंठा लेणी)


14. सरकारी बियाणं केंद्र