मुंबई : आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी.. पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..


राज्यातील ब्राह्मण संघटनांना पवारांचं चर्चेचं निमंत्रण


शरद पवारांकडून (Sharad pawar)  राज्यभरातील विविध ब्राह्मण संघटनांना चर्चेचं निमंत्रण देण्यात आले आहे. शरद पवार हे ब्राह्मणविरोधी (Brahman) असल्याची मतं सोशल मीडियावर (Social Media) काही जणांकडून व्यक्त केली जातात याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती देखील मिळत आहे. तर या बैठकीला आनंद दवेंच्या ब्राह्मण महासंघासह काही संघटनांचा विरोध आहे. मात्र इतर संघटना चर्चेसाठी तयार आहेत. पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात संध्याकाळी पाच वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आलंय. या बैठकीसाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाबरोबर विविध ब्राम्हण संघटनांना आमंत्रित करण्यात आलय.


अमित शाह आज अरूणाचल प्रदेश दौरा


गृहमंत्री अमित शाह दोन दिवसाच्या अरूणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. 


तेलंगणाचे मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर


तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर हे आठवडाभर दिल्ली दौऱ्यावर आहेत. विविध कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत.


राजीव गांधीच्या पुण्यतिथीनिमित्त 'भारत जोडो' अभियान


माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त 'भारत जोडो' अभियान भारतीय युवा कॉंग्रेसतर्फे राबवण्यात येणार आहे.


आज दिल्लीसाठी करो या मरो, समोर मुंबईचं आव्हान


आज आयपीएलमध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (MI vs DC) हे संघ आमने-सामने उतरणार आहेत. या दोघांमध्ये दिल्लीसाठी आजचा विजय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांच्या खात्यावर 14 गुण असल्याने आज ते सामना जिंकल्यासच 16 गुणांसह पुढील फेरीत जाण्यासाठी पात्र ठरु शकतात. अन्यथा बंगळुरुचा संघ पुढील फेरीत जाऊ शकतो. बंगळुरुच्या खात्यावरही 16 गुणच असले तरी दिल्लीचा नेट रनरेट चांगला असून आजही एक चांगला विजय मिळवल्यास ते प्लेऑफममध्ये एन्ट्री घेतील. तर मुंबई इंडियन्सचं आव्हान याआधीच संपलं असलं तरी हंगामातील शेवटचा सामना जिंकून शेवट गोड करण्यासाठी ते मैदानात उतरतील.