Pangong Lake Bridge : चीनकडून सीमेवरील आगळीक आणखी सूरूच आहे. चीनने आता पॅंगॉन्ग सरोवरावर दुसरा पूल बांधला आहे. परंतु, यावरून भारताने चीनला चांगलंच सुनावलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे की, चीनने 1960 पासून बेकायदेशीरपणे कब्जा केलेल्या भागात हे दोन्ही पूल आहेत. चीनचा हा कब्जा आम्हाला मान्य नाही, शिवाय त्या भागात चीनकडून केलेले कोणतेही बांधकाम आम्हाला मान्य नाही.
"जम्मू-काश्मीर हा आपला अविभाज्य भाग असल्याचे भारताने अनेक वेळा स्पष्ट केले आहे. इतर देशांनी भारताच्या सार्वभौमत्वाचा आणि अखंडतेचा आदर करावा अशी आमची अपेक्षा आहे. देशाच्या सुरक्षेशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकार सतत लक्ष ठेवत आहे, असे अरिंदम बागची यांनी म्हटले आहे.
चीनच्या PLA ने पूर्व लडाखमधील वादग्रस्त पॅंगॉन्ग सरोवरावर दुसऱ्या पुलाचे बांधकाम सुरू केले आहे. ज्याबद्दल ओपन-सोर्स इंटेलिजन्स, दाएद्रस्फा (डेमिन सिमोन) यांनी सॅटेलाइट इमेजद्वारे खुलासा केला होता. चीनने आपल्या अखत्यारीतील तलावावर पहिल्या पुलाप्रमाणे या पुलाचे बांधकाम सुरू केले असले तरी चिंतेची बाब म्हणजे तो भारताला लागून असलेल्या LAC च्या अगदी जवळ बांधण्यात आला आहे.
डेट्रास्फाने याबाबतचे काही फोटो प्रसिद्ध केले आहेत. त्यानुसार दुसरा पूल पहिल्या पुलाला लागून आहे. दुसरा पूल पॅंगॉन्ग सरोवराच्या दोन्ही टोकांवर म्हणजेच उत्तर आणि दक्षिण दोन्ही बाजूंनी बांधला जात आहे. हा पूल पूर्वीच्या पुलाला पूर्णपणे लागून आहे, ज्याचे बांधकाम नुकतेच चीनने पूर्ण केले आहे. असे मानले जाते की चीनचे पीएलए सैन्य येण्या-जाण्यासाठी वेगवेगळे पूल बांधत आहे.
चीन हे पूल पॅंगॉन्ग सरोवरावर बांधत आहे, जेणेकरून आपले सैनिक सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण भागात सहज जाऊ शकतील. 2019 मध्ये याच भागात चीन आणि भारतीय सैन्यात संघर्ष झाला होता. तेव्हापासून दोन्ही देशांत तणावाचं वातावरण कायम आहे, अशातच चीनने हा पूल बांधला आहे.