Lunar Eclipse of 2020: हिंदू पंचांगानुसार आज 30 नोव्हेंबर 2020 रोजी कार्तिक पौर्णिमेचं स्नान आहे आणि कार्तिक पौर्णिमेच्या या मुहुर्तावर या वर्षीचं शेवटचं चंद्रग्रहण देखील लागणार आहे. मात्र हे उपछाया चंद्र ग्रहण असल्यामुळं भारतात दिसणार नाही. कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला येणारं हे ग्रहणजवळपास 04 तास 18 मिनिट 11 सेकंदांपर्यंत असणार आहे. हे चंद्रग्रहण रोहिणी नक्षत्र आणि वृषभ राशीमध्ये पडणारं आहे. हे चंद्रग्रहण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, प्रशांत महासागर आणि आशियातील काही देशात दिसणार आहे.
चंद्रग्रहणाची वेळ
उपछायेचा पहिला स्पर्श : दुपारी 1:04 वाजता
परमग्रास चंद्र ग्रहण : दुपारी 3:13 वाजता
उपछायेचा अंतिम स्पर्श : सायंकाळी 5:22 वाजता
कार्तिक स्नान सकाळपासून सुरु होणार आहे. त्यामुळं कार्तिक पौर्णिमा स्नानावर चंद्र ग्रहणाचा काही परिणाम होणार नाही. कार्तिक स्नान सूर्योदयापूर्वी होणं गरजेचं आहे. स्नानानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची ध्यानधारणा करत दान करा. त्यामुळं लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि भक्तांची मनोकामना पूर्ण करते, अशी अख्यायिका आहे.
कार्तिक पौर्णिमा तिथी आणि शुभ मुहूर्त
कार्तिक पौर्णिमा तिथी : 30 नोव्हेंबर 2020
कार्तिक पौर्णिमा तिथी आरंभ: 29 नोव्हेंबर 2020 दुपारी 12 बजकर 47 मिनिटांपासून
कार्तिक पौर्णिमा तिथी समाप्त: 30 नोव्हेंबर 2020 दुपारी 02 बजकर 59 मिनिटांपर्यंत