नवी दिल्ली: केंद्रीय कॅबिनेटची आज महत्वपूर्ण बैठक होणार आहे. यामध्ये सर्वसाधारण अर्थसंकल्प मार्च ऐवजी 1 फेब्रुवारीलाच सादर करण्यासंदर्भात पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिनाभर आधीच अर्थसंकल्प सादर केला जाईल.
दरम्यान, अर्थसंकल्पाच्या या निर्णयाबरोबरच रेल्वे अर्थसंकल्पाबाबतही निर्णय घेतली जाण्याची शक्यता आहे. रेल्वेसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प न मांडता सर्वसामान्य अर्थसंकल्पातच त्याचा समावेश करण्याचा विचार सरु आहे. त्यामुळे या निर्णयाला आजच्या बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
रेल्वे अर्थसंकल्प हा ब्रिटीश काळापासून स्वतंत्ररित्या मांडण्यात येतो. मात्र, आता रेल्वे अर्थसंकल्पापेक्षाही संरक्षण मंत्रालयाचा अर्थसंकल्प मोठा असतो. आता रेल्वे अर्थ संकल्पाचा समावेश सर्वसाधारण बजेटमध्ये अंतर्भाव कसा करावा, यासाठी एक पाच जणांची समिती स्थापन करण्यात आली होती.