नवी दिल्लीः काश्मीरमधील उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी विशेष रणनिती आखली आहे. देशभरातून पाकिस्तानला कडवं उत्तर द्यावं, अशी मागणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.


काय आहेत 5 निर्णय?

  1. भारतीय सेनेच्या बेसकॅम्पची सुरक्षा आता पॅरा कमांडो करणार आहेत. अगोदरपासूनच वायू सेनेच्या हवाई मार्गाची सुरक्षा 'गरुड' पॅरा कमांडो करतात तर नौसेनेसाठी 'मारकोस' कमांडो काम करतात.

  2. पाकिस्तानी आतंकवाद्यांना भारतीय सीमेत घुसखोरी करण्यास मदत करणाऱ्यासाठी चर्चेत असणाऱ्या पाकिस्तानच्या 'बॅट' म्हणजेच बॉर्डर अॅक्शन टीमचा सामना करण्यासाठी भारतीय सेनेच्या 'घातक' बटालियनची नियुक्ती केली जाणार.

  3. एलओसी आणि सीमेच्या सुरक्षेसाठी जास्त सुरक्षाबळ तैनात करण्यात येणार.

  4. एलओसीच्या निगराणीसाठी सेना आता ड्रोनचा वापर करणार आहे. सध्या ड्रोनचा वापर काही भागांपर्यंतच मर्यादित आहे.

  5. उरीसारख्या हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी सीमा ओलांडून येणाऱ्या आतंकवाद्यांच्या खात्म्यासाठी सेनेकडून 'स्वच्छता अभियान' सुरु करण्यात येणार आहे.


 

एनआयएच्या शोधमोहीमेला वेग

एनआयएकडून उरी हल्ल्याची शोधमोहीम युद्धपातळीवर सुरु करण्यात आली आहे. एनआयएने सेनेकडून सर्व आवश्यक पुरावे मिळवले आहेत. आतंकवाद्यांकडून जप्त करण्यात आलेल्या जीपीएसची फॉरेन्सिक तपासणी करण्यासाठी एनआयए अमेरिकेची मदत घेणार आहे. या जीपीएसमुळे आतंकवादी कुठून आले, त्याचा शोध लागणार आहे.