टोल वाचवण्यासाठी कर्मचाऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटवलं
एबीपी माझा वेब टीम | 24 Jul 2016 05:26 AM (IST)
मुंबई : गुजरातमधील गोध्रात टोल न भरण्यावर अडून राहिलेल्या कारचालकाने टोल कर्मचाऱ्याला तब्बल अर्धा किलोमीटरपर्यंत घासत नेलं. गोध्रा-वडोदरा राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावर कर्मचाऱ्याने कारचालकाला रोखण्याचा खूप प्रयत्न केला पण या प्रयत्नात कारने त्याला अर्धा किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. टोलनाक्यावर कारचालकाने टोल देण्यास मनाई केल्यावर तेथील एक कर्मचारी कारच्या बोनेटवर चढला, परंतु तेव्हाच कारचालकाने कार सुरू करून तब्बल अर्धा किलोमीटरपर्यंत नेलं. हा सर्व प्रकार टोलनाक्यावरील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून फक्त 60 रूपयांसाठी हा प्रकार झाल्याचे समोर येत आहे. गेल्या काही दिवसांत टोलनाक्यांवर होणाऱ्या अशा घटनांमुळे टोल कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.