नवी दिल्ली : आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. या वेळी कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी त्यांनी हनुमान चालीसाचे वाचन करा असा अजब दावा त्यांनी केला आहे. प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या, '25 जुलै ते 5 ऑगस्ट दररोज सायंकाळी 7 वाजता हनुमान चालीसाचे वाचन पाच वेळा केल्याने देशातील कोरोना नष्ट होईल.'


दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सध्या देशाच भितीचे वातावरण आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अनेक उपाययोजना सरकारकडून करण्यात येत आहे. अशातच प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी ट्वीट करत कोरोना नष्ट करण्याचा उपाय सुचवला आहे.


आपल्या ट्वीटमध्ये प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या, कोरोना महामारी संपवण्यासाठी आणि लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी आपण सगळे एक आध्यात्मिक प्रयत्न करूया. आजपासून म्हणजे 25 जुलै ते 5 ऑगस्ट दररोज सायंकाळी 7 वाजता घरात हनुमान चालीसाचे पठण करा. 5 ऑगस्टला रामलल्लाची आरती केल्यानंतर घरात दिवा लावून समारोप करूया'.





उत्तरप्रदेशातील अयोध्येमध्ये राममंदिराचं काम ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार आहे. राममंदिराच्या भूमिपूजनाची तारीख देखील निश्चित झाली असून 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिरांचं भूमिपूजन करणार आहेत. या प्रसंगी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना बोलवण्याची शक्यता आहे.


संबंधित बातम्या :



राम मंदिर भूमिपूजनाची वेळ अशुभ; शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती याचं निवेदन


Majha Katta | संन्यासापासून ते भाजप नेतेपदापर्यंतचा प्रवास; हिंदुत्वाच्या ब्रँड नेत्या उमा भारतींशी गप्पा