Privilege Motion Against Ex-CJI and MP Gogoi : माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभेचे माजी खासदार रंजन गोगोई अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांनी राज्यसभेबाबत केलेल्या वक्तव्यावरून तृणमूल काँग्रेसचे खासदार आक्रमक झाले आहेत. माजी सरन्यायाधीश गोगाई यांच्याविरोधात तृणमूल काँग्रेसने हक्कभंगाची नोटीस दिली आहे.
काही दिवसांपूर्वी माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यावेळी बोलताना गोगोई यांनी राज्यसभेतील उपस्थितीबाबत वक्तव्य केले होते. त्यांचे हे वक्तव्य संसदेच्या वरिष्ठ सभागृहाची प्रतिष्ठा कमी करणारे असल्याचे तृणमूल काँग्रेसने नोटीसमध्ये म्हटले आहे. या हक्कभंगाच्या नोटीसमध्ये त्यांनी या मुलाखतीचा काही भागही नमूद केला आहे.
माजी सरन्यायाधीश गोगोई यांनी मुलाखतीत होते की, मला जेव्हा वाटेल तेव्हा मी राज्यसभेत जातो. जेव्हा मला वाटते की हा एक महत्त्वाचा विषय आहे ज्यावर मी बोलले पाहिजे, त्यावेळी सभागृहात असतो. मी नामनिर्देशित सदस्य आहे, मी कोणत्याही पक्षाच्या व्हिपशी बांधील नाही. त्यामुळे जेव्हा राजकीय पक्षाच्या सदस्यांना सभागृहात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले जातात तेव्हा ते माझ्यावर बंधनकारक नाही. मी माझ्या इच्छेनुसार तिथे जातो. त्यांनी मुलाखतीत वेतन आणि भत्त्यांबाबतही वक्तव्य केले. मी एखाद्या लवादाचा अध्यक्ष, प्रमुख असतो तर मला अधिक वेतन आणि सुविधा, भत्ते मिळाले असते. मी राज्यसभेतून एकही पैसा नेत नाही.
संसदेच्या नोंदीनुसार, मार्च 2020 नंतर संसदेत माजी सरन्यायाधीश आणि खासदार गोगोई यांची उपस्थितीती 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे. गोगाई यांनी त्यांच्या आत्मचरित्रात सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर केवळ चार महिन्यांनी राज्यसभेवर जाण्याच्या निर्णयाचा बचाव केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- OBC Reservation : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष
- आनंदवार्ता! मुंबईत रात्रीच्या वेळी होणार कोरोना लसीकरण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha