Vice President Election 2022 : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल कांग्रेस उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान करणार नाही. तृणमूल कांग्रेसच्या आज झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. तृणमूल कांग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. विरोधी पक्षांनी सल्लामसलत न करता मार्गारेट अल्वा यांच्या नावाची घोषणा केली, त्यामुळे तृणमूलने या निवणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. 


उपराष्ट्रपती पदासाठी  विरोधी पक्षांकडून मार्गारेट अल्वा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. परंतु, अल्वा यांचे नाव लोकशाहीपद्धतीने निवडण्यात आले नाही, असा आरोप तृणमूल काँग्रेसकडून करण्यात  आला आहे. तृणमूलच्या अनेक खासदारांचे देखील हेच मत असल्यामुळे पक्षाने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याचे अभिषेक बॅनर्जी यांनी सांगितले. एनडीएचे उमेदवार जगदीप धनकड यांनी पश्चिम बंगाचे राज्यपाल म्हणून काम करत असताना पक्षपाती भूमिक घेतल्यामुळे तृणमूल त्यांना देखील पाठिंबा देणार नाही. शिवाय विरोधी पक्षाचा उमेदवार निवडताना तृणमूल काँग्रेसला विश्वासात घेतले नसल्यामुळे आम्ही तटस्थ राहणार असल्याची भूमिका तृणमूल काँग्रेसने घेतली असल्याची माहिती अभिषेक बॅनर्जी यांनी दिली. 


जगदीप धनकड यांनी 2019 मध्ये पश्निच बंगालच्या राज्यपाल पदाची सुत्रे हाती घेतली. त्यावेळीपासून धनकड सरकारसोबतच्या वादामुळे कायम चर्चेत राहिले आहेत. त्यामुळे तृणमूल धडकड यांना पाठिंबा देणार नाही हे नक्की होतेच. परंतु, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा अल्वा यांना पाठिंबा न देण्याचा निर्णय विरोधी पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.
 
अल्वा यांनी मंगळवारी उपराष्ट्रपती पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी देखील तृणमूलचे प्रतिनिधीही उपस्थित नव्हते. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 6 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे.  


महत्वाच्या बातम्या


Jagdeep Dhankhar : मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसोबत पंगा, उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जगदीप धनकड यांच्या राज्यपाल कारकिर्दीतील 10 वाद   


Vice President Candidate : पश्चिम बंगलमधील कामगिरीचं फळ? कोण आहेत जगदीप धनकड?