मुनीर खान यांनी सांगितलं की, अटक करण्यात आलेले तिन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोयबाचे असून, या हल्लाचा मास्टर माईंड अबू इस्माईल आणि इतर तीन दहशतवादी अजूनही फरार आहेत. विशेष म्हणजे, यातील दोन दहशतवादी पाकिस्तानचे, तर एक काश्मिरी असल्याचं,'' खान यांनी यावेळी सांगितलं.
मुनीर खान यांनी पुढे सांगितलं की, ''दहशतवाद्यांच्या निशाण्यावर सीआरपीएफ आणि अमरनाथ यात्रेकरुंची बस होती. सुरुवातीला हा हल्ला 9 जुलै रोजी घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा मानस होता. पण त्या दिवशी सीआरपीएफ आणि अमरनाथ यात्रेकरुंची कोणतीही बस अमरनाथला जाणाऱ्या मार्गावरुन गेली नाही. त्यामुळे दहशतवाद्यांनी दुसऱ्याच दिवशी हल्ला घडवून आणला.''
दहशतवाद्यांनी या हल्ल्यात अमरनाथ यात्रेकरुंच्या बससाठी 'शौकत', तर सीआरपीएफच्या बससाठी 'बिलाल' हा कोडवर्ल्ड निश्चित केला होता.
अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर 10 जुलै रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात 7 भाविकांचा मृत्यू झाला होता. तर 19 भाविक जखमी झाले होते. या हल्ल्या मागे पाकिस्तानचा दहशतवादी मौलाना मसूद अजहर असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
कारण, मसूदनं काही दिवसांपूर्वी एक ऑडिओ प्रसारित केला होता. त्या टेपद्वारे भारतात मोठा दहशतवादी हल्ला करण्याचे संकेत दिले होते.
संबंधित बातम्या