मुंबई : देशातल्या सर्वाधिक तापमान असलेल्या 10 शहरांमध्ये विदर्भातली तीन शहरं अव्वल स्थानी आहेत, तर एकूण चार शहरांचा यादीत समावेश आहे. स्कायमेटनं जाहीर केलेल्या आकडेवारीत चंद्रपूर, नागपूर आणि ब्रम्हपुरीचा क्रमांक लागतो. चंद्रपूरमध्ये सर्वाधिक म्हणजेच तब्बल 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दुसऱ्या स्थानी नागपूर असून शहरात 43.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातीलच ब्रह्मपुरी हे या यादीत 43.3 अंश सेल्सिअस तापमानासह तिसऱ्या स्थानी आहे. दहा शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील चार, तर ओदिशातील चार शहरांचा समावेश आहे. अकोला शहर सहाव्या स्थानावर असून अकोल्यातही काल 42.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे तापमानात ही वाढ दिसून येत आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार येत्या 24 तासात या तापमानात घट होईल.
शहरराज्यतापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
चंद्रपूरमहाराष्ट्र44.2
नागपूरमहाराष्ट्र43.3
ब्रह्मपुरीमहाराष्ट्र43.3
कुर्नूलआंध्र प्रदेश42.8
झारसुगुडाओदिशा42.8
अकोलामहाराष्ट्र42.6
भवानीपटणाओदिशा42.5
सुंदरगडओदिशा42.5
तितलागडओदिशा42.1
गुलबर्गकर्नाटक42.1