नवी दिल्ली: शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरील विमानप्रवासबंदी एअर इंडियाने अखेर मागे घेतली आहे.


जवळपास दोन आठवड्यांनी ही बंदी हटवण्यात आली आहे. शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अखेर एअर इंडियाने आपला निर्णय मागे घेतला.

मात्र गायकवाड यांनी माफी माघावी अशी भूमिका एअर इंडियाने घेतली होती. पण मी संसदेची माफी मागेन, एअर इंडियाची नाही असं रवींद्र गायकवाड यांनी काल म्हटलं होतं.

खा. गायकवाड यांचा पुणे-दिल्ली प्रवासादरम्यान एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याशी वाद झाला होता.  23 मार्चला घडलेल्या या घटनेत खा. गायकवाड यांनी आपण कर्मचाऱ्याला सँडलने मारल्याचं कबुल केलं होतं. मात्र काल लोकसभेत निवेदन देताना, गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याने धक्का दिल्याने आपणही धक्का दिल्याचं म्हटलं होतं.

याप्रकरणी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही लक्ष घातलं होतं. अखेर 15 दिवसांनी एअर इंडियाने गायकवाडांवरील विमानप्रवास बंदी हटवली आहे.

काय आहे प्रकरण?

उस्मानाबादचे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड हे पुण्याहून दिल्लीला जात होते. बिझनेस क्लासचं तिकीट असताना आपल्याला इकॉनॉमिक क्लासमध्ये बसायला सांगितलं, असा दावा गायकवाड यांनी केला. रवींद्र गायकवाड त्याची तक्रार दिल्लीत गेल्यावर करणार होते. दिल्लीत विमान पोहोचल्यानंतर त्यांनी तक्रार पुस्तिका मागवली, पण एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी त्यासाठी नकार दिला, असा दावा गायकवाड यांनी केला.

विमानातून सर्व कर्मचारी उतरुन गेल्यानंतरही रवींद्र गायकवाड बसून राहिले. तक्रार करण्याचा त्यांचा हट्ट होता. त्यानतंर क्रू मेंबरने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला बोलावलं. मात्र त्या कर्मचाऱ्याने अरेरावीची भाषा केली, असं रवींद्र गायकवाड यांचं म्हणणं आहे.

‘मी शिवसेनेचा खासदार आहे, भाजपचा नाही,  मला तक्रार करायची आहे, असं मी म्हणालो. पण कोण खासदार, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगतो,  अशा भाषेत संबंधित कर्मचाऱ्याने उद्धट भाषा वापरली. त्यानंतर मी उठून त्याची कॉलर धरली आणि 25 सँडल मारले’’, अशी कबुली रवींद्र गायकवाड यांनी दिली.

भारतीय विमान संघाची बंदी

भारतीय विमान संघानं गायकवाडांवर बंदी घातली . जवळपास भारतातील सर्व विमान कंपन्यांनी गायकवाडांवर बंदी घातली . भारतीय विमान संघामध्ये गोएअर, जेट एअरवेज, जेटलाईट, इंडिगो यासारख्या प्रमुख विमान कंपन्यांचा समावेश आहे.

कोण आहेत रवींद्र गायकवाड?

– रवींद्र गायकवाड हे शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार आहेत

– लोकसभा निवडणुकीत रवींद्र गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला.

– उस्मानाबाद आणि परिसरात रवी सर म्हणून ते परिचित आहेत

– रवींद्र गायकवाड हे उमरगा मतदारसंघातून दोन वेळ विधानसभेवर निवडून गेले होते.

– दुष्काळी भागात पाझर तलावासाठी त्यांनी काम केलं आहे.


मी मारलं नाही, त्या अधिकाऱ्याला फक्त ढकललं: रवींद्र गायकवाड


शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी काल लोकसभेत शून्य प्रहरात आपलं निवदेन मांडलं. यावेळी त्यांनी एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. निवेदनात रवींद्र गायकवाड यांनी सभागृहाची माफी मागितली. पण आपण एअर इंडिया किंवा त्या अधिकाऱ्याची माफी मागणार नसल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलं. तसेच एफआयआरमध्ये दाखल करण्यात आलेलं 308 कलम म्हणजेच खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हा रद्द करण्याची मागणीही रवींद्र गायकवाड यांनी केली.



'सुरक्षेशी कोणतीही तडजोड नाही', हवाईमंत्र्यांनी गायकवाडांना ठणकावलं! 


रवींद्र गायकवाड यांच्या निवेदनानंतर शिवसेनेचे मंत्री अनंत गीतेंनी गायकवाडांवरची विमानप्रवास बंदी मागे घेण्याची विनंती केली. पण, हवाई वाहतूक मंत्री गजपती राजू यांनी मात्र प्रवाशांच्या सुरक्षेची तडजोड करणार नसल्याचं म्हटलं होतं.

सरकारच्या एकतर्फी निर्णयाची लाज वाटते : खा. अनंत गीते


कोणत्याही चौकशीविना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर विमान कंपन्यांनी घातलेली बंदी ही अत्यंत लाजीरवाणी आहे, मोदी सरकारने एकतर्फी निर्णय न घेता, गायकवाडांवरील विमानप्रवासाची बंदी उठवावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार आणि मोदींच्या मंत्रिमंडळात अवजड उद्योग मंत्रीपद सांभाळणारे अनंत गीते यांनी केली.


संबंधित बातम्या
'सुरक्षेशी कोणतीही तडजोड नाही', हवाईमंत्र्यांनी गायकवाडांना ठणकावलं!

मी मारलं नाही, त्या अधिकाऱ्याला फक्त ढकललं: रवींद्र गायकवाड

अखेर शिवसेना खा. रवींद्र गायकवाड संसदेत दाखल

सरकारच्या एकतर्फी निर्णयाची लाज वाटते : खा. अनंत गीते 



खा. गायकवाड दिल्लीत दाखल, लोकसभेत बाजू मांडणार

एअर इंडियाने खा. गायकवाड यांचं तिकीट पुन्हा रद्द केलं!

ना विमान, ना रेल्वे, आता रस्ते मार्गे खा. गायकवाड दिल्लीकडे

VIDEO: खा. रवींद्र गायकवाडांची गुंडगिरी विमानातल्या कॅमेऱ्यात कैद

प्रत्यक्षदर्शी एअर होस्टेस खासदार रवींद्र गायकवाड यांच्या बाजूने

कपिल शर्मावर बंदी नाही, मग खा. गायकवाडांवर का?: खा. अडसूळ

खा. रवींद्र गायकवाड गायबच, शिवसैनिकांची उस्मानाबाद बंदची हाक

खा. रवींद्र गायकवाड यांचं लेखी स्पष्टीकरण

पुन्हा त्याच विमानाने जाणार, एअर इंडियाने अडवून दाखवावं : गायकवाड

… म्हणून मी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला 25 सँडल मारले : रवींद्र गायकवाड