Shashi Tharoor Slams BJP : जे धाडसी आहेत, ज्यांच्यात लढण्याची हिंमत आहे ते कधीही भाजपमध्ये जाणार नसल्याचे वक्तव्य काँग्रेसचे नेते शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी केलं आहे. शशी थरुर यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केल आहे. तर ज्यांच्यात लढण्याची हिंमत नाही, त्यांनी  भाजपमध्ये सामील व्हावं असेही ते म्हणाले. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Assam Chief Minister Himanta Biswa Sarma) यांच्या वक्तव्यावर उत्तर देताना शशी थरूर यांनी आपलं मत व्यक्त केलं. 


नेमकं काय म्हणाले शशी थरुर


काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी सोशल मीडीयावर एक त्यांचा व्हिडीओ व्हायरल केला आहे. यामध्ये त्यांनी अस म्हटलं आहे की, जे लोक धाडसी आहेत, ज्यांच्यामध्ये लढण्याची हिंमत आहेत, ते कधीही भाजपमध्ये जाणार नाहीत. तर ज्यांच्यामध्ये लढण्याची, संघर्ष करण्याची तयारी नसेल त्यांनी भाजपमध्येसामील व्हावं असेही थरुर म्हणालेत. त्यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या वक्तव्यावर ही प्रतिक्रिया दिली आहे.


 




काय म्हणाले होते आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा 


आगामी काळात आणखी काही काँग्रेसचे लोक भाजपमध्ये सामील होणार आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शशी थरुर यांना मतं दिलेले सर्वजण भाजपमध्ये प्रवेश करतील, असं वक्तव्य आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी केलं होतं. काही लोकांना वाटते की मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेस पक्षाच्या लोकशाहीचे प्रतीक आहेत. मला माहीत नाही लोकांना असे का वाटते ते. पण शशी थरूर जिंकले असते तर मी म्हणालो असतो की काँग्रेसमध्ये लोकशाही आली आहे. ज्यांनी शशी थरूर यांना मत दिले ते चांगल्या विचारसरणीचे लोक असल्याचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा म्हणाले होते.


शशी थरुर यांना मत देणारे  चांगले लोक आहेत


काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शशी थरुर यांना मत देणारे काही चांगले लोक काँग्रेसमध्ये असल्याचे वक्तव्य आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनीकेले आहे. मला पूर्ण आशा आहे की, ते लोक येत्या काही दिवसात भाजपसोबत येतील असे ते म्हणाले होते. दरम्यान, शशी थरूर यांना एक हजार लोकांनी मतदान केले होते. तेच लोक भाजपमध्ये सामील होतील असेही हिमंत बिस्वा सरमा म्हणाले. काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांनी शशी थरुर यांचा पराभव केला होता. मात्र, या निवडणुकीत शशी थरुर यांना एक हजार मते मिळाली होती.


महत्त्वाच्या बातम्या:


काँग्रेसच्या सुकाणू समितीत शशी थरुर यांना स्थान नाही, वर्किंग कमिटीच्या निवडणुका घेऊन बदल घडवणार खर्गे?