Wrestlers Protest Update: दिल्लीतील जंतर-मंतर या ठिकाणी सुरु असलेले कुस्तीपटूंचे आंदोलन (Wrestlers Protest) अखेर मागे घेण्यात आले आहे.  भाजपाचे खासदार आणि कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्याविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरु होते. मात्र आता या प्रकरणात आरोपपत्र देखील दाखल करण्यात आले आहे. 'तर संघर्ष हा न्यायालयातून सुरुच राहिल' असं कुस्तापटूंकडून सांगण्यात येत आहे. 


दरम्यान, बृजभूषण सिंह यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राची प्रत कुस्तीपटूंनी द्यावी असे निर्देश न्यायालयाने दिल्ली पोलिसांनी दिले आहेत.  या प्रकरणात राऊस एवेन्यू कोर्टात सोमवारी (26 जून) रोजी सुनावणी करण्यात आली.  कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राची कॉपी देण्यात यावी अशी मागणी केली होती. 


दिल्ली पोलिसांनी 15 जून रोजी भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्या विरोधात 1500 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. सहा महिला कुस्तीपटूंनी केलेल्या तक्रारीनंतर हे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. दरम्यान कुस्तीपटू साक्षी मलिक हिने (25 जून) रोजी ट्विट करत, त्यांचा संघर्ष न्यायालयामध्ये सुरु ठेवणार असल्याचं म्हटलं होतं. 


दिल्ली पोलिसांनी 15 जून रोजी बृजभूषण शरण सिंह यांच्यावरील पोक्सो अंतर्गत आरोप रद्द करण्याची शिफारस केली होती. कारण अल्पवयीन महिला कुस्तीपटूंनी त्यांचे आरोप मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी बृजभूषण सिंह यांच्या विरोधात लैंगिक छळ केल्याच्या आरोपांवर आरोपपत्र दाखल केलं आहे. दिल्ली पोलिसांनी पटियाला हाऊस कोर्टात अल्पवयीन कुस्तीपटूच्या लैंगिक छळ प्रकरणासंदर्भात रद्द अहवाल दाखल केला आहे. 4 जुलै रोजी न्यायालय रद्द अहवालावर सुनावणी करणार आहे. तसेच, बृजभूषण शरण सिंह यांच्यावर सहा प्रौढ कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी पोलिसांनी राऊस अव्हेन्यू न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. 


ऑलिम्पिक पदकविजेते कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक, ऑलिम्पियन विनेश फोगट यांच्यासह देशातील अनेक दिग्गज कुस्तीपटू यांनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोन करत त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. हे आंदोलन मागील अनेक दिवसांपासून सुरु आहे. बृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोप आहेत. याप्रकरणी सरकारसोबत चर्चेनंतर कुस्तीपटूंनी  आंदोलन स्थगित केलं होतं. 


दरम्यान या आरोपपत्रामध्ये कुस्तापटूंनी सादर केलेल्या अनेक पुराव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आरोपपत्रात प्रत्येक तक्रारीचा स्वतंत्र उल्लेख करण्यात आला आहे. सहा महिला कुस्तीपटूंनी आपल्या तक्रारींमध्ये अनेक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. तसेच प्रत्येक आरोपासाठी साक्षीदार, फोटो किंवा व्हिडीओ असल्याचा दावा देखील कुस्तीपटूंनी केला आहे.  


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Vinesh Phogat On Yogeshwar Dutt: '...आणि ते हसणं डोक्यात गेलं', योगेश्वर दत्त यांच्यावर विनेश फोगाटची संतप्त प्रतिक्रिया