नवी दिल्ली: पाकिस्तानात बेपत्ता झालेले हजरत निजामुद्दीन दरगाहचे दोन मौलवी आज भारतात परतले. सकाळी दिल्ली विमानतळावर दोघा मोलवींचं कुटुंबियांनी स्वागत केलं.

निजामुद्दीन दर्गाचे प्रमुख मौलवी सैय्यद आसिफ अली निजामी आणि त्यांचे पुतणे नाजिम अली निजामी 6 मार्च रोजी कराचीला गेले होते. पण, याच दरम्यान ते पाकिस्तानाच बेपत्ता झाल्याचं सांगण्यात येत होतं.

त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानसोबत त्यांच्याविषयी चर्चा केली. त्यानंतर हे दोन्ही मौलवी सुरक्षित असल्याची माहिती मिळाली होती.

दरम्यान मौलवी सैय्यद आसिफ अली निजामी यांची बहिणी कराचीत राहते. आपल्या बहिणीला भेटण्यासाठी ते कराचीत गेले होते, अशी माहिती समोर आली  आहे.