मुंबई : अयोध्येतील (Ayodhya) नवीन विमानतळाचे (Airport) नाव महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम असे असणार आहे. एनआयएला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही बातमी समोर आली आहे. दरम्यान 27 डिसेंबर रोजी येथील रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अयोध्या धाम जंक्शन  असे करण्यात आले आहे. त्यानंतर आता अयोध्येतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव देखील ठरवण्यात आल्याची माहिती समोर येतेय. 







पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार 30 डिसेंबर रोजी अयोध्येला भेट देणार आहेत. यादरम्यान पंतप्रधान मोदी विमानतळ आणि रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान कार्यालय (PMO) नुसार, अयोध्येच्या अत्याधुनिक विमानतळाचा पहिला टप्पा 1,450 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून तयार करण्यात आलाय.   विमानतळ टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ 6500 चौरस मीटर असेल, जे दरवर्षी सुमारे 10 लाख प्रवाशांना सेवा देण्यासाठी सज्ज असेल.


आधुनिक सुविधांनी सुसज्ज


दरम्यान या विमानतळाच्या इमारतीचे बांधकाम हे अयोध्येतील श्रीरामाच्या मंदिरासारखे आहे. अयोध्या विमानतळाची टर्मिनल इमारत विविध सुविधांनी सुसज्ज आहे ज्यात इन्सुलेटेड रूफिंग सिस्टीम, एलईडी लाइटिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग, कारंज्यांसह लँडस्केपिंग, वॉटर ट्रीटमेंट प्लांट, सीवेज ट्रीटमेंट प्लांट, सोलर पॉवर प्लांट यांचा समावेश आहे.


अयोध्या धाम जंक्शनची खासियत


पुनर्विकसित अयोध्या रेल्वे स्थानकाचा पहिला टप्पा 240 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित करण्यात आला आहे. अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाणारे तीन मजली आधुनिक रेल्वे स्थानक लिफ्ट, एस्केलेटर, फूड प्लाझा, पूजा गरजांसाठी दुकाने, क्लोक रूम, चाइल्ड केअर रूम, वेटिंग हॉल यासारख्या सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. 


एक जानेवारीपासून भाविकांसाठी खुलं होणार स्थानक


अयोध्या धाम रेल्वे स्थानक सज्ज असून 1 जानेवारीपासून सर्वसामान्य भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी अयोध्या धाम रेल्वे स्थानकावरूनच वंदे भारत आणि अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. याशिवाय पीएम मोदी श्री राम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटनही करणार आहेत.


राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा


22 जानेवारी रोजी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सहभागी होणार आहेत. याशिवाय अनेक नेते आणि अभिनेते या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : 


Ayodhya Railway Station : राम मंदिर उद्घाटना आधीच अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलले! आता 'या' नावाने असणार स्टेशन