मुंबई: भारतातल्या मान्सूनची अल निनोच्या कचाट्यातून सुटका झाल्याची माहिती भारतीय हवामान खात्यानं दिली आहे. भारतात अल निनोचं आगमन मान्सूनच्या चौथ्या महिन्यात होणार आहे. त्यामुळे आम्ही अल निनोची अजिबात काळजी करत नसल्याचं हवामान खात्याचे महानिर्देशक के.जे रमेश यांनी सांगितलं.
केरळमध्ये 1 जूनपर्यंत पावसाला सुरुवात होईल तर राजस्थानात सप्टेंबरपर्यंत मान्सून पोचणार असल्याची माहिती त्यांनी दिली. भारतात अल निनोचं आगमन जुलैच्या नंतरच होईल. मात्र, त्यामुळे मान्सूनचं प्रमाण खूप घटेल किंवा कमी पाऊस होण्याची शक्यता नसल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, सुरुवातीला अल निनोचा प्रभाव राहणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण आता अल निनोचा मान्सूनवर प्रभाव होणार नसल्यानं राज्यासह देशभरात समाधानकारक पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अल निनोमुळे जगाच्या बहुतांश भागात/ भारतात कमी पाऊस/दुष्काळ/अवर्षणाची स्थिती होते. तर अल निनोमुळे भारतात सरासरी इतका किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्यास मदत होते. ऑस्ट्रेलियासारख्या काही देशात महापुराच्या घटनाही घडतात.
अल निनोचा प्रभाव कमी होऊन तो न्यूट्रल राहिला, तरी आपल्याकडे सरासरी पाऊसमान होण्याच्या आशा वाढतात.
2016 हे वर्ष आत्तापर्यंतच्या सर्वात उष्ण वर्षांपैकी एक मानलं जातं. त्याचा सर्वाधिक फटका ऑस्ट्रेलियाला बसला आहे. मात्र भारतात आणि त्यातही महाराष्ट्रासाठी 2016 हे आधीच्या तुलनेत चांगल्या/सरासरी पावसाचं वर्ष राहिलं.
संबंधित बातम्या: