नवी दिल्ली : काळ्या पैशाविरोधात सामान्य माणूसही सैनिक बनला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. नवी दिल्लीत संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.


https://twitter.com/PMOIndia/status/801997574945128449

ज्या लोकांना नोटाबंदीच्या निर्णयावर आक्षेप आहे, त्यांना सरकारच्या पूर्वतयारीवर नव्हे, तर त्यांना ‘तयारी’ करण्यासाठी वेळ मिळाला नाही, याची त्यांना खंत आहे.”, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

काळ्या पैशाविरोधातील लढाईला बळ मिळावं म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर देशभरात एकच गोंधळ उडाला. सर्वसामान्य लोकांकडून या निर्णयाला पाठिंबा मिळत असला, तरी अनेकांचे दैनंदिन व्यवहार कोलमडले आहेत. त्यामुळे विरोधकांकडून मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावर कडाडून टीका केली जात आहे.