The Central Board of Secondary Education : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (The Central Board of Secondary Education) देशातील विविध राज्यांतील 20 शाळांची मान्यता रद्द केली आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान, छत्तीसगड, आसाम, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश व्यतिरिक्त, या 20 शाळा केरळ आणि उत्तराखंडमधील आहेत. सीबीएसईचे (The Central Board of Secondary Education) सचिव हिमांशू गुप्ता यांनी या प्रकरणी सांगितले की, या 20 शाळा नियमांविरुद्धच वागतानाच गैरव्यवहारातही सामील आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील दोन शाळांचा यामध्ये समावेश आहे. राहुल इंटरनॅशनल स्कूल, ठाणे आणि पायोनियर पब्लिक स्कूल, पुणे या दोन शाळांची मान्यता रद्द केली आहे. 






कोणत्या राज्यात किती शाळा आहेत?


ज्या राज्यांच्या शाळा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दिल्लीत 5 आणि उत्तर प्रदेशात तीन शाळा आहेत. केरळ, महाराष्ट्र, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये प्रत्येकी दोन शाळा आहेत. तर, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि आसाममध्ये प्रत्येकी एक शाळा अशी आहे ज्यांची मान्यता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने रद्द केली आहे.


या शाळांची मान्यता रद्द करण्यात आली



  • सिद्धार्थ पब्लिक स्कूल, दिल्ली-81

  • मॅरीगोल्ड पब्लिक स्कूल, दिल्ली-39

  • भारत माता सरस्वती बाल मंदिर, दिल्ली-40

  • नॅशनल पब्लिक स्कूल, दिल्ली-40

  • चांद राम सार्वजनिक वरिष्ठ माध्यमिक विद्यालय, दिल्ली-39

  • लॉयल पब्लिक स्कूल, बुलंदशहर, उत्तर प्रदेश

  • क्रिसेंट कॉन्व्हेंट स्कूल, गाझीपूर, उत्तर प्रदेश

  • ट्रिनिटी वर्ल्ड स्कूल, गौतम बुद्ध नगर, उत्तर प्रदेश

  • प्रिन्स यूसीएच माध्यमिक विद्यालय, सीकर, राजस्थान

  • ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल, जोधपूर, राजस्थान

  • द्रोणाचार्य पब्लिक स्कूल, रायपूर, छत्तीसगड

  • वायकन शाळा, विधानसभा मार्ग, रायपूर, छत्तीसगड

  • राहुल इंटरनॅशनल स्कूल, ठाणे, महाराष्ट्र

  • पायोनियर पब्लिक स्कूल, पुणे, महाराष्ट्र

  • पीव्ही पब्लिक स्कूल, मलप्पुरम, केरळ

  • मदर थेरेसा मेमोरियल सेंट्रल स्कूल, तिरुवनंतपुरम, केरळ

  • करतार पब्लिक स्कूल, कठुआ, जम्मू आणि काश्मीर

  • SAI RNS अकादमी, दिसपूर, गुवाहाटी, आसाम

  • सरदार पटेल पब्लिक स्कूल, मिसरोड हुजूर, भोपाळ, मध्य प्रदेश

  • ज्ञान आइन्स्टाईन इंटरनॅशनल स्कूल, डेहराडून, उत्तराखंड


इतर महत्वाच्या बातम्या