मुंबई : देशात कोरोना लसीकरण हे पूर्णपणे ऐच्छिक स्वरुपाचे आहे. परंतु भारतातील लस सुरक्षित आहे का? लस घेतल्यानंतर व्यक्तीच्या शरीरामध्ये पुरेशा प्रमाणात अँटीबॉडीज निर्माण होतील का? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे. कोरोना लसीकरणाच्या अनुषंगाने सर्वसामान्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे लेडी हार्डिंग कॉलेजचे डॉ. एन एन माथुर यांनी दिली आहे.


प्रश्न- आपल्या देशात दोन वॅक्सीन आहे. पहिले वॅक्सीन ज्या कंपनीचे घेतले दुसरे वॅक्सीन देखील त्या कंपनीचे घेणे गरजेचे आहे का?
उत्तर : हो, पहिला डोस ज्या कंपनीचा घेतला आहे. दुसरा डोस देखील त्या कंपनीचा घेतला पाहिजे. दुसऱ्या डोससाठी 4 आठवड्यानंतर बोलवण्यात येईल. 21 किंवा 28 दिवसाच्या आत दुसरा डोस घेणे गरजेचे आहे. दुसरा डोस घेण्यास जास्त उशीर करु नये. लवकरात लवकर दुसरा डोस घ्यावा.


प्रश्न- वॅक्सीनचे दोन डोस का दिले जातात?
उत्तर : आतापर्यंत जेवढे वॅक्सीन बनवण्यात आले आहे. त्या सर्व वॅक्सीनचे ट्रायल दोन डोसचे आहे. दोन डोस घेतल्यानंतर शरीरात अँटीबॉडी पुरेशा प्रमाणात निर्माण होण्यास मदत होते, हे अभ्यासानंतर समोर आले आहे. आता आम्ही हे तर टेस्ट नाही केले की, आधी किती अँटीबॉडी होत्या आणि आता किती झाल्या आहेत. वॅक्सीनचे दोन डोस घेणे हा एक प्रोटोकॉल आहे. ज्यानुसार प्रत्येक व्यक्तीने दोन डोस घेणे गरजेचे आहे. पहिला डोस असेल आणि दुसरा बुस्टर.


प्रश्न- बरे होण्याचा दर जर  96 टक्के आहे मग तरी सगळ्यांनी वॅक्सीन घेणे गरजेचे आहे का?
उत्तर : 96 टक्के रिकव्हरी रेट म्हणजे ज्या नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.  त्यातील 96   टक्के बरे झाले आहे. याचा अर्थ असा होतो की, 96  टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे वॅक्सीन सगळ्यांसाठी उपयोगी आहे. हर्ड इम्युनिटी निर्माण होण्यासाठी वॅक्सीन घेणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त लोकांमध्ये अँटीबॉडी निर्माण होण्यासाठी लस घेणे गरजेचे आहे.


प्रश्न- वॅक्सीनसाठी जी तारीख मिळाली, त्या दिवशी आपण पोहचलो नाही तर काय होईल?
उत्तर : जेव्हा वॅक्सीन येईल, वॅक्सीनसाठी कोविन अॅपवर नोंदणी करणे गरजेचे आहे. अॅपशिवाय नोंदणी करता येते, यासाठी जिल्हा प्रशासन मदत करेल. जर तुम्ही वैयक्ति कारणांमुळे लस घेण्यासाठी पोहचला नाही तर, तुमचा नंबर किती दिवसांनी येणार हे सरकाराकडून तुम्हाला कळवण्यात येईल. परंतु ज्या दिवशी लसीकरणासाठी बोलवले आहे त्या दिवशीच जाण्याचा प्रयत्न करा.


प्रश्न- वॅक्सीन घेतल्यानंतर शरीरात अँटीबॉडी निर्माण होतील का?
उत्तर : हो, वॅक्सीन घेतल्यानंतर शरीरात अँटीबॉडी तयार होण्यास मदत होईल. ज्यांना वॅक्सीन दिले जाईल. त्यांच्या शरिरात अँटीबॉडी तयार होण्यास मदत होईल. आता किती लोकांमध्ये अँटीबॉडी तयार झाल्या आहेत, हा संशोधनाचा विषय आहे. लसीकरणा दरम्यान संशोधनाचे काम देखील सुरू आहे. अभ्यासात समोर आलेली माहिती लोकांसमोर देखील येणार आहे. जनतेला देखील वॅक्सीनच्या एफिशिअन्सी बाबतीत माहिती दिली जाईल.




#Coronavirus | कोरोनाबाबत तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं, थेट तज्ज्ञांकडून!